शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

आनंदवन परिसरातील नऊ एकरातील जनावरांचा चारा जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 11:22 IST

आनंदवनातील ग्रीन हाऊस बैलबंडा परिसरात जनावरांकरिता चाऱ्याची लागवड केली जाते. या चाऱ्याला गुरूवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आग लागली. यात नऊ एकरातील जनावरांचा चारा जळून खाक झाला.

ठळक मुद्देग्रीन हाऊस परिसरातील घटना

आॅनलाईन लोकमतवरोरा : आनंदवनातील ग्रीन हाऊस बैलबंडा परिसरात जनावरांकरिता चाऱ्याची लागवड केली जाते. या चाऱ्याला गुरूवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आग लागली. यात नऊ एकरातील जनावरांचा चारा जळून खाक झाला.घटनेनंतर आनंदवनातील कार्यकर्त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अखेरीस वरोरा पालिकेच्या अग्निशामक दलाला घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. आनंदवनात मोठ्या प्रमाणात पाळीव जनावरे आहेत. या जनावरांकरिता चाऱ्याची लागवड आनंदवनातील ग्रीन हॉऊस बैलबंडा परिसरातील नऊ एकरात केली जाते. या जागेवर प्रत्येकी तीन महिन्यात चाऱ्याची लागवड केली जाते.सध्या लागवड केलेला चारा वाळव्याच्या स्थितीत असताना चाऱ्याला आग लागली. घटनास्थळानजीक वीज कंपनीचे ट्रान्सफार्मर आहे तसेच नजीकच आनंदवनाची वसाहत आहे. त्यामुळे आग विझविण्याकरिता आनंदवनातील कार्यकर्ते शर्थीचे प्रयत्न करीत होते. आग आटोक्यात आणण्याकरिता वरोरा पालिकेचे अग्निशमक दल पोहचले व आगीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र जनावरांचा चारा जळाल्याने भविष्यात चाऱ्याची टंचाई उद्भवण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Accidentअपघात