शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

चिमूर पोलिस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 12:26 IST

Chandrapur : २० जणांची ओळख पटली

लोकमत न्यूज नेटवर्कचिमूर (चंद्रपूर) : दोन अल्पवयीन मुलींवर दोन नराधमांकडून अत्याचार झाल्याची बाब पुढे आल्यानंतर सोमवारी रात्री चिमूरपोलिस ठाण्यावर चालून जात टायर जाळणे व पोलिस ठाण्यावर दगडफेक करणाऱ्या जमावावर चिमूर पोलिसांनी कारवाईचे शस्त्र उगारले आहे. याप्रकरणी ओळख पटलेल्या जमावातील २० आंदोलकांवर भारतीय न्याय संहिता कलम १९१ (२), १८९(२), १९१(३), १३२, ३२९ (४) व सार्वजनिक संपत्तीची हानी प्रतिबंध अधिनियम १९८४ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सीसीटीव्ही फुटेज तपासून अन्य आंदोलकांवर कारवाई करण्यात येणार आहे. यामध्ये शंभरावर आंदोलकांवर कारवाईचे संकेत ठाणेदार संतोष बाकल यांनी दिले. अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

चिमूर येथील दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना पुढे आल्यानंतर परिसरातील नागरिक संतप्त होऊन आरोपींच्या घरावर चालून गेले. ही वार्ता कळतात चिमूर ठाणेदार आपल्या सहकाऱ्यांसह तेथे आहे. ठाणेदार संतोष बाकल यांनी त्याच ठिकाणी मुलीच्या आईकडून तोंडी तक्रार स्वीकारली. यानंतर रशीद रुस्तम शेख याला ताब्यात घेऊन ठाण्याकडे घेऊन गेले. दुसरा आरोपी नसीर वजीर शेख हा पोलिसांना शरण आला. जमाव आक्रमक होत असताना पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी ठाणेदार बाकल यांच्या फिर्यादीवरून ओळख पटलेल्या जमावातील २० जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव करीत आहेत. सीसीटीव्ही फुटेज पाहून आणखी आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ठाणेदार बाकल यांनी दिली.

आरोपींना ताब्यात द्या, जमाव झाला होता संतप्त

  • संतप्त जमाव पोलिस ठाण्यावर चालून गेला. जमावाने टायर जाळून घटनेचा निषेध नोंदविला. यानंतर जमाव आक्रमक होऊन ठाण्याच्या दारावर गेला. आरोपींना आमच्या ताब्यात द्या, अशी मागणी करू लागला.
  • जमाव अनियंत्रित झाल्याने धक्काबुक्की सुरू झाली. यानंतर याचे रूपांतर पोलिस ठाण्यावर दगडफेक करण्यात झाले. यामध्ये पोलिस ठाण्याच्या खिडकीच्या काचा फुटल्या. तसेच एक महिला शिपाई व एक होमगार्ड जखमी झाले.

त्या दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी

  • चिमूर (चंद्रपूर) : चिमूर शहरातील एका वस्तीत राहणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर त्याच वॉर्डात राहणाऱ्या रशीद रुस्तम शेख व नशीर वजीर शेख या दोन आरोपींनी अत्याचार केल्याची घटना सोमवारी रात्री उघडकीस आली होती.
  • पोलिसांनी दोन्ही आरोपींवर विविध गुन्हे दाखल करून अटक केली. मंगळवारी सत्र न्यायालय वरोरा यांनी आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली होती.
  • बुधवारी पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे.
टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरchimur-acचिमूरPoliceपोलिस