शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅव्हल्समधून सुगंधित तंबाखूची वाहतूक; तिघांवर गुन्हा दाखल 

By परिमल डोहणे | Updated: September 16, 2022 22:02 IST

15 लाख 32 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, सावली पोलिसांची कारवाई

चंद्रपूर :अवैध प्रतिबंधित तंबाखू व गुटख्याची वाहतूक होत असल्याच्या माहितीच्या आधारावर सावली पोलिसांनी नाकाबंदी करून अवैध प्रतिबंधित तंबाखू व गुटखा गुरुवारी सायंकाळी जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी चालक तरकेश्र्वर साहू (43), वाहक बिर किशोर सूनानी (33), तुमेश कुमार साहू (28) यांच्यावर कलम 188, 272, 273 भादवी सह कलम 59 अन्न सुरक्षा मानके अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

या कारवाईत पोलिसांनी 32 हजार 266 हजार रुपयांचा सुगंधित तंबाखू पानमसाला व ट्रॅव्हल्स असा एकूण 15 लाख 32 हजार 266 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शासनाने सुगंधित तंबाखू गुटखा पानमसाल्यावर बंदी घातली आहे. तरीसुद्धा अनेकजण सुगंधित तंबाखूची तस्करी करून विक्री करत आहेत. ट्रॅव्हल्समधून सुगंधी तंबाखूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती सावली पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष बोरकर यांना मिळाली. त्यांनी आपल्या पथकासह गडचिरोली चंद्रपूर रोडवर नाकाबंदी केली.

रायपूर ते चंद्रपूर जाणाऱ्या ट्रॅव्हल्स क्रं सीजी 19 एफ 0833 ला थांबवून तपासणी केली. यावेळी ट्रॅव्हल्सच्या डिकीत सुगंधित तंबाखू आढळून आला. पोलिसांनी सुगंधित तंबाखू व ट्रॅव्हल्स असा एकूण 15 लाख 32 हजार 266 रूपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई सदरची कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी मल्लिकार्जुन इंगळे, ठाणेदार आशिष बोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ दादाजी बोलिवार, पोहेका दर्शन लाटकर, नापोका विशाल दुर्योधन आदींनी केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी