आॅनलाईन लोकमतचंद्रपूर : ४२ टक्के वनाच्छादित प्रदेश, ८० वाघ, २५० ते ३०० विविध पक्षांच्या प्रजातीची उपलब्धता, भव्य प्राचीन वारसा, डौलाने उभे असलेले बुरुज, यामुळे राज्याचे लक्ष वेधणाऱ्या चंद्रपूरच्या शिरपेचात नव्या ‘बटरफ्लाय’ वर्ल्डची भर पडणार आहे.राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते १० फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता ताडोबाजवळच्या आगरझरीत या पार्कचे लोकार्पण करणार आहेत.कार्यक्रमाला वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे आदींची उपस्थिती राहणार असून मुख्य वनसंरक्षक मुकूल त्रिवेदी, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक गजेंद्र नरवणे उपस्थित राहणार आहेत. या पार्कमध्ये फुलपाखरांच्या अनेक प्रजाती बघायला मिळणार असून या संदर्भातील अद्यावत शास्त्रीय माहितीचा खजिना, काचेच्या घरांमध्ये फुलपाखरांचा मुक्त विहार या ठिकाणी असणार आहे.
आगरझरीत उभे राहणार ‘बटरफ्लाय’ वर्ल्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2018 23:44 IST
४२ टक्के वनाच्छादित प्रदेश, ८० वाघ, २५० ते ३०० विविध पक्षांच्या प्रजातीची उपलब्धता, भव्य प्राचीन वारसा, डौलाने उभे असलेले बुरुज, यामुळे राज्याचे लक्ष वेधणाऱ्या चंद्रपूरच्या शिरपेचात नव्या ‘बटरफ्लाय’ वर्ल्डची भर पडणार आहे.
आगरझरीत उभे राहणार ‘बटरफ्लाय’ वर्ल्ड
ठळक मुद्देपालकमंत्र्यांच्या हस्ते शनिवारी लोकार्पण