अंगणवाडीसेविकांवर कागदी घोड्यांचा भार

By Admin | Updated: December 25, 2014 23:29 IST2014-12-25T23:29:47+5:302014-12-25T23:29:47+5:30

चिमुकल्या मुलांचे प्राथमिक शाळेत नाव दाखल करण्यापूर्वी त्यांना चांगल्या सवयी लावण्याचे काम अंगणवाडी केंद्रामधून होते. परंतु, या मूळ उद्देशाला बाजूला सारून अंगणवाडी सेविकांवर अनेक

The burden of paper horse on the anganwadi workers | अंगणवाडीसेविकांवर कागदी घोड्यांचा भार

अंगणवाडीसेविकांवर कागदी घोड्यांचा भार

चंद्रपूर : चिमुकल्या मुलांचे प्राथमिक शाळेत नाव दाखल करण्यापूर्वी त्यांना चांगल्या सवयी लावण्याचे काम अंगणवाडी केंद्रामधून होते. परंतु, या मूळ उद्देशाला बाजूला सारून अंगणवाडी सेविकांवर अनेक कामे लादल्या जात आहेत. तुटपुंजा मानधनावर त्यांना ही सगळी कामे करावी लागत असल्यामुळे सेविकांत असंतोष वाढला आहे.
शासनाच्या शैक्षणिक योजनेंतर्गत अंगणवाडीमध्ये लहान मुलांना बोलके करण्याकरिता व अक्षर ओळख करण्याकरिता आंगणवाडी सेविका करीत आहेत. केंद्र व राज्यशासन मिळून अंगणवाडी सेविकेला ५ हजार रुपये, मिनी अंगणवाडी सेविकेला २४५० रुपए, अंगणवाडी मदतनिसांना २५०० रुपये मानधन दरमहा दिले जात आहे.
मात्र शिकवणीच्या कामाव्यतीरिक्त अंगणवाडी सेविकेला आरोग्य विभागाशी संबंधित सर्वेक्षणाची व अन्य कामे दिली जात आहेत. वेळोवेळी बाहेरगावी सभा, मेळाव्यासाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यामुळे सेविकेला मुलांना सांभाळणे त्यांना आवश्यक असणाऱ्या प्राथमिक शिक्षणाच्या कामात बाधा येत आहे. अंगणवाडीमुळे मुलांमधील कुपोषितपणा दूर करण्यास मोठी मदत होत आहे.
मात्र आंगणवाडी सेविकांना शैक्षणिक कामाव्यतिरीक्त दर महिन्याला इतर कामे करावी लागत असल्याने कुपोषणमुक्तीच्या उद्देशाला हरताळ फासली जात आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The burden of paper horse on the anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.