शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

शहरात रात्रीतून बिल्डिंग उभी राहतेय; पालिकेने परवानगी दिली कधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 15:11 IST

Chandrapur : चंद्रपूर शहरात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा मुख्यालय असलेले चंद्रपूर शहर झपाट्याने विस्तारत आहे. रात्र उलटली की, नवे बांधकाम डोके वर काढत आहे. असे असले तरी बांधकाम परवानगीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या अगदीच कमी आहे. विनापरवानगीने होत असलेल्या बांधकामामुळे महापालिकेचा महसूल बुडत आहे. काहींनी तर थेट रस्त्यापर्यंत बांधकाम केले आहे. त्यामुळे जागेच्या कारणातून वादही निर्माण होत आहेत. अगदी नदीपात्र परिसरातही बांधकामे केली जात आहे. मात्र, महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

चंद्रपूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येकाला हक्काचे घर असावे असे वाटते. त्यातूनच अनेक जण प्लॉट घेऊन बांधकाम सुरू करतात. मात्र, बांधकाम सुरू करण्यापूर्वी महापालिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे. महापालिकेने रीतसर परवानगी दिल्यानंतरच बांधकाम वैध ठरते. असे असताना केवळ महसूल चुकविण्यासाठी आणि अधिकृत प्लॉट नसलेले परवानगीविनाच घराचे बांधकाम करून मोकळे होत आहे. त्यामुळे बांधकामे अधिक आणि महापालिकेची परवानगी कमी असे काहीसे चित्र सध्या दिसत आहे. 

परवाना यासाठी गरजेचाबांधकाम परवानगी विविध कारणांसाठी आवश्यक आहे. परवानगी घेऊन बांधकाम केल्यामुळे भविष्यात कुठलीही अडचण उद्भवत नाही. शिवाय शेजाऱ्यांशी वादही टळतात. अनेकदा केवळ दीड ते दोन फुटांच्या जागेसाठी मोठा वाद होताना दिसतो.

कोरोनानंतर मरगळ झटकलीकोरोनाकाळात सर्व व्यवहार ठप्प पडले होते. कोरोनामुळे मंदीचे सावट आले होते. गत दोन वर्षापासून गाडी कुठे रुळावर आली आहे. त्यामुळे खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले आहे. रिअल इस्टेटमध्ये तेजी दिसत आहे.

अनधिकृत बांधकामांकडे होतेय दुर्लक्षशहरात मोठ्या प्रमाणात बांधकामे केली जात आहेत. त्या तुलनेत परवानगीसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची संख्या अगदीच कमी आहे. अनधिकृत बांधकामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.

प्लॉट घेऊन बांधकामखुला प्लॉट घेतला की त्यावर घर बांधता येते. मात्र, यासाठी महापालिकेची परवानगी घ्यावी लागते.

परवानगीकडे दुर्लक्षशहरातील बांधकामांची संख्या पाहता अर्ज करणाऱ्यांची संख्या कमीच आहे. महापालिका प्रशासनाने यासंबंधाने दखल घेत जनजागृती मोहीम राबविणे गरजेचे आहे.

परवाना नाकारण्याची कारणे कोणती?खुल्या प्लॉटवर बांधकाम करायचे असेल तर नकाशा, तसेच अन्य प्रशासकीय परवानगी आवश्यक असते. संपूर्ण कागदपत्र तपासून नियमानुसार परवानगी दिली जाते.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूर