शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

रेन वॉटर हॉर्वेस्टिंग न करणे बांधकामधारकांना भोवले, महानगरपालिकेची कारवाई

By राजेश मडावी | Updated: May 23, 2023 17:41 IST

बांधकामधारकांची अनामत रक्कम जप्त

चंद्रपूर : महानगरपालिका हद्दीत बांधकाम करताना रेन वॉटर हॉर्वेस्टिंग व्यवस्था करणे अनिवार्य आहे. त्यासाठी इमारत बांधकाम परवानगी देताना छताच्या आकारानुसार व मजलानिहाय अनामत रक्कम आकारली जाते. मात्र, बांधकाम पूर्ण झाल्यानंतर रेनवॉटर हॉर्वेस्टिंग केल्याचे पुरावे सादर न केल्याने महानगरपालिकाने मंगळवारी सहा बांधकामधारकांची अनामत रक्कम जप्त केली.

चंद्रपुरात भूगर्भातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. यावर उपाययोजना म्हणून पावसाळ्यात पडणारा प्रत्येक पावसाचा थेंब हा जमिनीत जिरविण्याची गरज आहे. पाण्याची पातळी वाढविण्यासाठी मनपमार्फत रेन वॉटर हार्वेस्टिंग उपक्रम सुरू केले रेन वॉटर हार्वेस्टिंगची अमलबजावणी करण्यासाठी मालमत्ताधारकांना मनपाकडून घराच्या छताच्या आकारमानानुसार ५ हजार, ७ हजार, १० हजार असे वाढीव अनुदान तथा पुढील ३ वर्षांपर्यंत मालमत्ता करात २ टक्के सूट दिली जात आहे. बांधकामधारांना रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी यापूर्वी १५ दिवसांचा वेळ देण्यात आला होता. मात्र या कालावधीत पुरावे सादर न केल्याने तुकूम, वडगाव, भानापेठ व समाधी वॉर्ड, शास्त्रीनगर येथील सहा बांधकाम परवानगीधारकांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली.

प्रोत्साहनासाठी जलमित्रांच्या नियुक्त्या

रेन वॉटर हार्वेस्टिंग मोहिमेबाबत जनजागृती करण्यासाठी प्रत्येक वार्डात स्वेच्छेने काम करणारे जलमित्र मनपाकडून नियुक्त केले जात आहेत. जलमित्र म्हणून काम करताना त्यांच्या वॉर्डात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना पुरस्कृत केले जाणार आहे. जलमित्रांच्या प्रोत्साहनामुळे १०१ घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग केल्यास प्लॅटिनम,५१ घरी केल्यास गोल्ड व २१ घरी हार्वेस्टिंग केल्यास सिल्वर श्रेणीने पुरस्कृत केले जाणार आहे. जलमित्र म्हणून काम करावयाचे असल्यास मनपा रेन वॉटर हार्वेस्टिंग कक्षात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.शहरातील विहीर, बोअरवेल धारकांनाही रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक आहे. यासाठी त्यांना काही दिवसांचा कालावधी दिला जातो. या कालावधीत रेन वॉटर हार्वेस्टींग न केल्यास २० हजारांचा दंड ठोठाविण्यात येईल. त्यामुळे सर्वांनी ही यंत्रणा बसवून प्रशासनाला सहकार्य करावे.

- विपीन पालिपाल, आयुक्त महापालिका चंद्रपूर

टॅग्स :Waterपाणीchandrapur-acचंद्रपूर