शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
4
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
5
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
6
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
7
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
8
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
9
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
10
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
11
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
12
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
13
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
14
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
15
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
16
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
17
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
18
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
19
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
20
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ

बदलते तंत्रज्ञान आणि भविष्यातील बदलांचा वेध घेऊनच नवे उद्योग उभारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2021 05:00 IST

विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या उद्योगांसंदर्भात आपल्या संकल्पना मांडल्या. रामकिशन सारडा म्हणाले, केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या ४ हजार ४४५ कोटींच्या मेगाप्रकल्पाला राज्य सरकारने जागा द्यावी. चंद्रपुरात नागपूरच्या कळमणा मार्केटच्या धर्तीवर बाजारपेठेची गरज आहे. डाॅ. चेतन खुटेमाटे यांनी सिंगापूरच्या धर्तीवर बायामेडिकल हबची गरज मांडली. जीवन पोनतनवार यांनी मेगा फूड प्राॅड्क्टस प्रकल्प उभारण्याकडे लक्ष वेधले. प्रवीण गाठी यांनी उद्योगांना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष वेधले.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : डिझेल, पेट्रोलवर धावणारी वाहने भविष्यात कालबाह्य झालेली असेल. इलेक्ट्रिक, हायड्रोजनवर धावणारी वाहने रस्त्यावर येतील. ऑटोमोबाइल क्षेत्रात मोठे बदल होत आहे. आयटी क्षेत्रही व्यापक झालेले असेल. नवीन उद्योग उभा करताना भविष्यात घडून येणाऱ्या बदलांचा वेध घेणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले. खासदार बाळू धानोरकर यांच्या संकल्पनेतील संवाद उद्योगांशी कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. व्यासपीठावर पालकमंत्री विजय वडेट्टीवार, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार प्रफुल्ल पटेल, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभा धानोरकर, आमदार किशोर जोरगेवार, प्रवीण कुटे पाटील, माजी खासदार सुबोध मोहिते उपस्थित होते. प्रास्ताविकात खासदार धानोरकर म्हणाले, धान, कापूस हे जिल्ह्याचे प्रमुख पीक आहे. यावर आधारित उद्योग उभा झाल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होईल. निप्पाॅन डेंड्रो प्रकल्प अद्यापही पूर्ण झाला नाही. नव्या उद्योगांची निर्मिती झाल्यास रोजगाराच्या संधी चालून येतील. यासाठी उद्योगांना वीज दरात सूट  असावी, शिवाय विमानतळाचा प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे. याप्रसंगी विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी आपल्या उद्योगांसंदर्भात आपल्या संकल्पना मांडल्या. रामकिशन सारडा म्हणाले, केंद्र सरकारने मंजुरी दिलेल्या ४ हजार ४४५ कोटींच्या मेगाप्रकल्पाला राज्य सरकारने जागा द्यावी. चंद्रपुरात नागपूरच्या कळमणा मार्केटच्या धर्तीवर बाजारपेठेची गरज आहे. डाॅ. चेतन खुटेमाटे यांनी सिंगापूरच्या धर्तीवर बायामेडिकल हबची गरज मांडली. जीवन पोनतनवार यांनी मेगा फूड प्राॅड्क्टस प्रकल्प उभारण्याकडे लक्ष वेधले. प्रवीण गाठी यांनी उद्योगांना भेडसावणाऱ्या प्रश्नांकडे लक्ष वेधले. प्रा. योगेश दूधपचारे यांनी विमानतळाची गरज व्यक्त केली. शिवाय गोंडवाना विद्यापीठाचा दर्जा सुधारण्याची गरज व्यक्त केली. रोजगारावर आधारित अभ्यासक्रम हवा. वनावर आधारित उद्योगांकडे लक्ष वेधले. विनोद दत्तात्रय यांनीही गोंडवाना विद्यापीठांकडून महाविद्यालयांना सोई पुरविण्याची मागणी केली. ॲड. आशिष धर्मपुरीवार यांनी न्याय व्यवस्था ही १३१ वर्षांपूर्वीची असल्याचे सांगून नवीन इमारत उभारण्याची मागणी केली. हर्षवर्धन सिंघवी यांनी व्यापाऱ्यांची समस्या मांडली. वॅट आणि सेवा कराचा मुद्दा उपस्थित करून लहान उद्योगांना प्रोत्साहन देण्याची गरज व्यक्त केली. चंद्रपूर एमआयडीसीचे अध्यक्ष मधुसुदन रुंगठा यांनी नव्या उद्योगांपुढे कामगार युनियनचा मोठा प्रश्न असल्याचे सांगितले.

दहा वर्षांत ऑटो इंडस्ट्रीजचा चेहरा बदलणार :  प्रफुल्ल पटेलचंद्रपूरला निसर्गाने खूप काही दिले आहे. आता पर्यावरणाचाही विचार करावा लागेल, अशी स्थिती आहे. टेक्नाॅलाॅजीत मोठे बदल होत आहेत. पुढील दहा वर्षांत ऑटोमोबाइल इंडस्ट्रीजमध्ये मोठे बदल झालेले दिसेल. प्रत्येक क्षेत्रात बदल होणार आहे. या बदलांचा विचार करूनच नवीन उद्योगांची निर्मितीची गरज आहे, असे मार्गदर्शन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले

चंद्रपूर जिल्ह्यात पर्यावरणपूरक उद्योग हवा : विजय वडेट्टीवारउद्योगवाढीला नेहमीच समर्थन आहे. शरद पवार यांनी मनात आणले तर जिल्ह्यातील समस्या सुटतील. कापूस इकडे पिकतो. उद्योग तिकडे जातात. टेक्सटाइल्स पार्कची विदर्भाला गरज आहे. जिल्ह्यात ब्रोकनराईसपासून इथेनाॅलचा उद्योग उभारण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात उद्योगांसाठी अतिशय पोषक वातावरण आहे. कुठेही युनियनमुळे उद्योग बंद झाला नाही. मात्र उद्योगांच्या प्रदूषणाने चंद्रपूर जिल्ह्याचा श्वास कोंडला आहे. पर्यावरणपूरक उद्योग हवा आहे. यासोबतच आता नवीन चंद्रपूरची संकल्पना पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी मांडली.

सुसंवादातून उद्योगांचा विकास : बाळू धानोरकरचंद्रपूर जिल्हा औद्योगिक म्हणून ओळखला जातो. आज नवीन आव्हाने उभी ठरली. या मात करण्यासाठी नियोजनबद्ध धोरण तयार करून काम करण्याचे गरजेचे आहे. उद्योजक आणि सरकारमध्ये सुसंवादही अत्यावश्यक असल्याने कार्यक्रमाचे नाविन्यपूर्ण आयोजन केल्याचे खा. बाळू धानोरकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारVijay Vadettiwarविजय वडेट्टीवार