शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

बीएसएनएल लॅडलाईनचे ग्राहकांना मिळणार फक्त ई-बिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 22:42 IST

चंद्रपूर येथील दूरसंचार महाप्रबंधक कार्यालयाच्या पूर्णता पेपरलेस लँडलाईन सर्विसला सुरुवात झाली आहे. जानेवारी २०१९ पासून बिीएसएनएलकडून कोणत्याही ग्राहकाला छापील बिल जाणार नसून बिल प्राप्त करण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी नोंद करण्याचे आवाहन या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.

ठळक मुद्देपेपरलेस कार्यपद्धती : चंद्रपूर दूरसंचार कार्यालयाचा संकल्प

चंद्रपूर : चंद्रपूर येथील दूरसंचार महाप्रबंधक कार्यालयाच्या पूर्णता पेपरलेस लँडलाईन सर्विसला सुरुवात झाली आहे. जानेवारी २०१९ पासून बिीएसएनएलकडून कोणत्याही ग्राहकाला छापील बिल जाणार नसून बिल प्राप्त करण्यासाठी आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी नोंद करण्याचे आवाहन या कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.मोबाईल फोनच्या युगामध्ये घरात वापरण्यात येणाऱ्या वायरनी जोडलेला लॅन्डलाईन फोन मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. मात्र तरीही इंटरनेटचा वापर आणि कार्यालयांमध्ये लैंडलाइनचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. कधीकाळी ६७ हजारांवर चंद्रपूर महानगरात होते.मात्र आता ही संख्या १४ हजाराच्या आसपास आली आहे. पण सोबतच ब्रॉडबंड वापरणाºया ग्राहकांची संख्यादेखील वाढली आहे. आता या सर्व ग्राहकांना १ जानेवारी २०१९ पासून बीएसएनएलकडून पूर्णत: छापील बिल मिळणे बंद करण्यात आले आहे.तथापि ग्राहकांची असुविधा होऊ नये, यासाठी ग्राहकांनी आपला मोबाईल क्रमांक व ई-मेल आयडी यावरून ही बिल प्राप्त करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.ज्या ग्राहकांकडे पोस्टपेड मोबाईल आहे. त्यांनी ई-मेल रजिस्टर करण्यासाठी पुढील पद्धतीचा अवलंब करून ५३३३३ या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. तसेच वेबसाईटवर रजिस्टर करण्यासाठी कंपनीच्या संकेत स्थळाला भेट देणे आवश्यक आहे.या संदर्भात अधिक माहिती हवी असल्यास बिएसएनएलच्या कार्यालयात संपर्क साधावा लागणार आहे.ग्राहकांचे लॅन्डलाईन अथवा महत्वाच्या मोबाईलचे बिल आपल्या इमेलवर घेणाºया ग्राहकांना प्रत्येक महिन्याच्या बिलामध्ये दहा रुपयांची सवलतदेखील दिली जाईल. एक जानेवारीपासून ग्राहकांना छापील बिल न देता फक्त ई-मेलद्वारे बिल पाठवले जाणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्राहकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन बीएसएनएलचे मुख्य लेखाधिकारी के.जी.आयतुलवार यांनी केले आहे.