शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

हायप्रोफाइल नेत्यांच्या चंद्रपूर जिल्ह्यात इच्छुकांची भाऊगर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2019 02:23 IST

काँग्रेसपुढे घराणेशाहीचे आव्हान : शिवसेनेची घर शाबूत ठेवण्यासाठी धडपड, नावाला उरलेल्या राष्ट्रवादीला हवे नवे घर

राजेश भोजेकरचंद्रपूर : राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, या हायप्रोफाईल नेत्यांच्या जिल्ह्यात सहापैकी तीन ठिकाणी तिरंगी तर तीन ठिकाणी दुरंगी लढतीचे चित्र आहे. राजुरा, चंद्रपूर, ब्रह्मपुरी आणि चिमूर येथे भाजप, वरोरा शिवसेना, तर ब्रह्मपुरी काँग्रेसकडे आहेत. आघाडीत काँग्रेसचा सर्वच सहाही जागांवर दावा आहे. मात्र राष्ट्रवादीने ब्रह्मपुरी, राजुरा व बल्लारपूरसाठी हालचाली चालविल्या आहेत. ब्रह्मपुरी हा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा मतदारसंघ आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संदीप गड्डमवार यांचा येथून जुनाच दावा आहे. राजुऱ्यात गत निवडणुकीत काँग्रेसचे माजी आमदार सुभाष धोटे यांचा फार थोड्या फरकाने पराभव झाला. राष्ट्रवादीकडून माजी आमदार सुदर्शन निमकर फिल्डींग लावून असले तरी काँग्रेस ही जागा सोडण्याची चिन्हे नाहीत.

बल्लारपूरवर राष्ट्रवादीच्या माजी जिल्हाध्यक्षांचा डोळा आहे. २०१४ चे काँग्रेस उमेदवार घनश्याम मुलचंदानी हेही तयारीत आहे. हा मतदारसंघ वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा असून त्यांनी या क्षेत्राचा चेहरामोहराच बदलला आहे. त्यांच्या तोडीचा उमेदवार आघाडीकडे दिसत नाही. चंद्रपूरची जागा आघाडीत काँग्रेसकडेच राहील. २०१४ मध्ये काँग्रेसचे महेश मेंढे तिसºया क्रमांकावर होते. हे हेरून दुसºया क्रमांकावरील शिवसेना उमेदवार किशोर जोरगेवार यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेसचे तिकीट मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत.

चिमूरमध्ये आघाडीकडून काँग्रेस जि. प. गटनेता व माजी आमदार अविनाश वारजुकर यांचे धाकटे बंधू डॉ. सतीश वारजुकर पूर्ण तयारीत आहेत. त्यांचा दावा मजबूत मानला जात आहे. वरोºयात काँग्रेस घराणेशाहीत अडकली आहे. गत निवडणुकीत डॉ. आसावरी देवतळे या तिसºया क्रमांकावर होत्या. आता त्यांच्यासह त्यांचे यजमान डॉ. विजय देवतळेही इच्छुक आहेत. तसेच खासदार सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी आपल्या पत्नीचे, प्रतिभा यांचे नाव पुढे केल्याने काँग्रेसपुढे घराणेशाहीचे नवे आव्हान आहे.

युतीमध्ये भाजप चंद्रपूर, बल्लारपूर, राजुरा, ब्रह्मपुरी आणि चिमूर या पाच जागांवर तयारीत आहे. चंद्रपुरात आमदार नाना श्यामकुळे यांना दावेदार मानले जात असले तरी भाजपचे जि. प. समाजकल्याण सभापती ब्रिजभूषण पाझारे उमेदवार बदलाची आशा बाळगून आहेत. राजुरा येथे आमदार अ‍ॅड. संजय धोटे हे पूर्ण तयारीत असले तरी जि.प. अध्यक्ष देवराव भोंगळेंचाही या मतदारसंघावर डोळा आहे.ब्रह्मपुरीत युतीकडून भाजपचे माजी आमदार अतुल देशकर तयारीत असले तरी हा मतदार संघ काँग्रेसचे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा असल्यामुळे भाजपला दमदार उमेदवाराचा शोध आहे. चिमूरमध्ये भाजपकडून विद्यमान आमदार कीर्तीकुमार भांगडिया हे एकमेव दावेदार मानले जात आहेत.

वरोºयात शिवसेनेचे वर्चस्व आहे. सुरेश धानोरकर यांनी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेसकडून लोकसभा जिंकली. ही संधी साधून काँग्रेसचा हात सोडून भाजपात गेलेले माजी मंत्री संजय देवतळे हे पुन्हा बाशिंग बांधून तयार आहेत. येथे शिवसेनेचा दावा मजबूत असून भद्रावती नगराध्यक्ष अनिल धानोरकर पूर्ण तयारीत आहेत. अनिल धानोरकर हे काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांचे बंधू आहेत. वंचित बहुजन आघाडीकडून चिमूर मतदारसंघात अरविंद सांदेकर हे नाव पुढे आहे.

एकूण जागा : ६ । सध्याचे बलाबल भाजप-०४, शिवसेना-०१, कॉँग्रेस-०१

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019chandrapur-acचंद्रपूरwarora-acवारराballarpur-acबल्लारपूरchimur-acचिमूर