शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 05:44 IST

तक्रारदाराने नोव्हेंबर २०२३ मध्ये परवान्यासाठी अर्ज केला. मात्र  अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खरोडे यांच्याकडून परवाना देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात होती.

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर :  बीअर शाॅपीच्या परवान्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी मंगळवारी  चंद्रपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील यांच्यासह दुय्यम निरीक्षक चेतन खारोडे व कार्यालय अधीक्षक अभय खाताड हे तीन अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले. नागपुरातील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. तिघांवरही रात्री उशिरापर्यंत शहर पोलिसात गुन्हा दाखल होण्याची कारवाई सुरू होती, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक मंजूषा भोसले यांनी दिली.

तक्रारदाराने नोव्हेंबर २०२३ मध्ये परवान्यासाठी अर्ज केला. मात्र  अधीक्षक संजय पाटील, दुय्यम निरीक्षक चेतन खरोडे यांच्याकडून परवाना देण्यास टाळाटाळ करण्यास सुरुवात होती. दरम्यान, खरोडे यांनी परवाना मंजूर करण्यासाठी स्वत:सह अधीक्षक संजय पाटील यांच्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली.  

गोंदियातही कारवाई, तहसीलदारावर गुन्हागोंदिया : जप्त केलेला रेतीचा टिप्पर सोडण्यासाठी एक लाख रुपयांची मागणी करणाऱ्या गोरेगावचे तहसीलदार, एक नायब तहसीलदार व एका खासगी व्यक्ती विरुद्ध गोंदियाच्या लाचलुचतपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी कारवाई केली. तहसीलदार किसन भदाणे, नायब तहसीलदार नागपुरे व तहसील कार्यालयातील संगणक चालक गणवीर या तिघांनी एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्यामुळे   त्यांच्यावर कारवाई केली आहे.