शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
6
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
7
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
8
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
9
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
10
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
11
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
13
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
14
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
15
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
16
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
17
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
18
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
19
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
20
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरणने ब्रह्मपुरी पालिकेची बत्ती केली गुल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 12:15 IST

विद्युत बिल थकीत : १२ तास नगरपालिकेचे सर्व विभाग विजेविनाच

दत्तात्रय दलाल लोकमत न्यूज नेटवर्क ब्रह्मपुरी : स्वायत्त संस्था असलेल्या नगर परिषद इमारतीचा विद्युत पुरवठा विद्युत विभागाकडून डी.पी. वरून खंडित करण्यात आला. त्यामुळे दिवसभर विद्युत पुरवठ्याविना कर्मचाऱ्यांना काम करावे लागले. सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास नगर परिषदेने धनादेश तयार असून उद्या बँकेत जमा करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याने विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यात आला. नगर परिषदेला तब्बल बारा तास अंधारात राहावे लागले. हा प्रकार २९ नोव्हेंबरला घडला. 

शिक्षणाचे माहेरघर, वैद्यकीय नगरी म्हणून नावारूपास आलेल्या ब्रह्मपुरी शहराचा परीघ व लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे नगर परिषद क्षेत्रातील गावठाण हद्द वाढविण्यात यावी, असा ठराव नगर परिषदेने काही महिन्यांपूर्वी घेतला आहे. 

न. प. हद्दीत येणाऱ्या सर्व क्षेत्रात मूलभूत सुविधा पुरविण्याचे कार्य नगर परिषदेला करावे लागते. त्यात रस्ते, पाणी, पथदिवे आदींचा समावेश होतो. या सर्वांचा खर्च विविध योजनांतून करण्यात येतो. पाणीपुरवठा करण्याकरिता मोठ्या प्रमाणात विजेचा वापर करण्यात येतो. त्याकरिता येणारे वीज बिल व पथदिव्यांच्या बिलाचा भरणादेखील नगर परिषदेला करावा लागतो. शिवाय नगर परिषद इमारतीत व जलतरण तलावात वापरण्यात येणाऱ्या विजेचे बिलदेखील भरावे लागते. तब्बल चार महिन्यांपासून न.प.ने कार्यालयातील विद्युत बिलाचा भरणा केला नसल्याने विद्युत विभागाने डी. पी. वरून वीजपुरवठा खंडित केला. त्यामुळे नगर परिषदेचे कार्यालयीन काम दिवसभर खोळंबून असल्याचे दिसून आले. दरम्यान, ३० नोव्हेंबरला नगर परिषदेने ३ लाख ६५ हजार रुपयांचा धनादेश बँकेत जमा करून बिलाचा भरणा केला, अशी माहिती न.प.च्या विद्युत विभागाकडून देण्यात आली.

नगर परिषदेकडे पन्नास लाखांहून अधिकचे बिल थकीत पाणीपुरवठा विभागाकडे तब्बल ५५ लक्ष रुपयांचे विद्युत बिल थकीत होते. त्यातील २३ लक्ष रुपये अदा करण्यात आल्याची माहिती आहे, तर पथदिव्यांचे एकूण वीज बिल १८ लक्ष रुपये आहे. शिवाय न. प. कार्यालयीन वीज बिल ४ लक्ष रुपये आहे. असा एकूण ५० लक्ष रुपयांहून अधिक वीज बिल नगर परिषदेकडे थकीत आहे.

"पंधराव्या वित्त आयोगाचा निधी मागील सहा महिन्यांपासून आलेला नाही. याच निधीतून सर्व वीज बिल अदा करण्यात येतात. नगर परिषद स्वायत्त संस्था व शासकीय कार्यालय असल्याने विद्युत विभागाकडून वीज खंडित करायला नको होती. निधी अप्राप्त असल्याचे विद्युत विभागाला कळविण्यात आले होते. न. प. फंडातून वीज बिल भरण्यात आले." - अर्शिया जुही, मुख्याधिकारी, नगर परिषद, ब्रह्मपुरी

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरbramhapuri-acब्रह्मपुरी