शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

ब्रह्मपुरीकरही उन्हाच्या काहिलीने बेजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2019 00:10 IST

मागील वर्षी जगात तर मतदानाच्या दिवशी म्हणजेच ११ एप्रिलला देशात उष्णतेचा उच्चांक गाठलेल्या ब्रम्हपुरी शहरात आता सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. ग्रामीण भाग असला तरी उन्हाच्या तडाख्याने येथील जनजीवनही विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देपारा चंद्रपूरच्याही पुढे : भविष्याच्या दृष्टीने उपाययोजनांची गरज

रवी रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कब्रम्हपुरी : मागील वर्षी जगात तर मतदानाच्या दिवशी म्हणजेच ११ एप्रिलला देशात उष्णतेचा उच्चांक गाठलेल्या ब्रम्हपुरी शहरात आता सूर्य अक्षरश: आग ओकत आहे. ग्रामीण भाग असला तरी उन्हाच्या तडाख्याने येथील जनजीवनही विस्कळीत झाले आहे.रस्ते दुपारी १२ ते ४ वाजेपर्यंत निर्मनुष्य होत असल्याचे पहायला मिळत आहे. सध्या एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु असून आता मे महिनाही तीन दिवसानंतर सुरू होईल. एप्रिल महिन्यातच ब्रह्मपुरीचा पारा ४६ अंशापार गेला आहे.मे महिना अजूनही शिल्लक असल्याने ब्रम्हपुरीवासीयांच्या उरात उन्हाची धडकी भरली आहे. वर्तमान काळातच भविष्यकाळाचा वेध घेऊन सर्वांनी सतर्क होऊन सदर महत्वपूर्ण समस्येच्या निराकरणासाठी प्रशासनाने कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची गरज आहे.ब्रम्हपुरी तालुका जरी जंगलाने व्यापलेला असला तरी त्यामानाने शहरात वृक्षांचा अभाव आहे. शहरातील रिकाम्या जागा अधिक असून त्या ओसाड पडल्या आहेत. तेथे वृक्षांची लागवड करून त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे. केवळ ग्रीन सिटी म्हणून कागदी उपचार नको आहे. ब्रह्मपुरीच्या वाढत्या तापमानामुळे आताच यावर गंभीरतेने विचार होणे गरजेचे आहे.दिवसेंदिवस लोकसंख्येत वाढब्रम्हपुरीची विद्यानगरी, आरोग्यनगरी, सांस्कृतिक नगरी म्हणून पंचक्रोशीत ओळख असल्याने येथील लोकसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. वाहनांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मोठमोठ्या इमारती उभ्या राहत आहे. शहराच्या सभोवताली जवळपास १५ राईस मिल आणि कुकसावर आधारित खाद्य तेलाची निर्मिती करणारा आॅईलचा कारखाना आहे. यामुळे शहरातील प्रदूषण सातत्याने वाढत आहे. या वाढत्या प्रदूषणाला वेळीच आवर घातला ााही किंवा काही ठोस उपाययोजना केल्या नाही तर भविष्यात उष्णतेची तीव्रता वाढून तापमानात वाढ होतच राहील आणि याचा विपरीत परिणाम नागरिकांना भोगावा लागेल.हवामान केंद्राचे ठिकाण बदलावेतापमानाची नोंद करण्याकरिता इंग्रज काळापासून तहसील कार्यालय परिसरात यंत्र बसविण्यात आले होते. तत्कालीन परिस्थितीनुसार ते ठिकाण योग्य होते. परंतु सध्याच्या परिस्थितीत सदर तापमानाची नोंद करणारे हवामान केंद्राचे ठिकाण चुकीचे असल्याचे मत भूगोल अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. तहसील कार्यालयाच्या सभोवताली दाट वस्ती निर्माण झाली असून उंच-उंच इमारती बांधल्या आहेत. त्यामुळे नोंद केलेले तापमान अचुक असेल, या शाश्वती देता येत नाही. हवामान केंद्राचे ठिकाण बदलविणे आवश्यक आहे.तालुक्यात चुनखडीचे खडक अधिकब्रम्हपुरी तालुका ‘लेटेराईट मृदे’चा बनलेला असून या मृदेतून ‘चुनखडी’चे अस्तित्व निघून गेल्याने फक्त खडक बाकी आहे. ते अत्यंत तापतात, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. परंतु हे जरी खरे असले तरी भविष्याच्या दृष्टीने त्यावर काही उपाययोजना करून त्याची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी करणे आवश्यक आहे.रविवारी चंद्रपूरच्या तापमानाने गाठला उच्चांकचंद्रपूर : चंद्रपूरने तापमानाबाबत आपला राजेशाही रविवारी पुन्हा कायम केली. आतापर्यंत राज्यात अकोला सर्वाधिक तापमानाचे शहर ठरत आले होते. आज चंद्रपूरने तापमानात अकोल्याशी बरोबरी साधली. दोन्ही शहराचे रविवारचे तापमान ४७.२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. मागील पाच दिवसांपासून चंद्रपूरच्या तापमानात दररोज सुमारे एक ते दीड अंशाने वाढ होत आहे. गुरुवारी चंद्रपूरचे तापमान ४५.५ अंश सेल्सिअस, शुक्रवारी ४५.६ अंश सेल्सिअस, शनिवारी ४६.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. रविवारी ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. आज चंद्रपूरने तापमानात पुन्हा उच्चांक गाठला.

टॅग्स :weatherहवामान