शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा नदीत बुडून मृत्यू; चंद्रपुरातील इरई नदीघाटावरील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 21:34 IST

मंगळवारी सकाळी साहिल आपल्या तीन मित्रांसह विठ्ठल मंदिर परिसरातून वाहणाऱ्या इरई नदी येथे पोहण्यासाठी गेला होता.

चंद्रपूर : मित्रासोबत नदीवर पोहण्यासाठी गेलेल्या मुलाचा इरई नदीत बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. साहिल प्रवीण घुमे (१४), रा. विठ्ठल मंदिर वॉर्ड असे त्या मृत मुलाचे नाव आहे. विशेष म्हणजे मंगळवारी दुपारी त्या मुलाचा शालेयस्तरीय कबड्डी सामना होता; परंतु त्यापूर्वीच त्याचे दु:खद निधन झाले.

मंगळवारी सकाळी साहिल आपल्या तीन मित्रांसह विठ्ठल मंदिर परिसरातून वाहणाऱ्या इरई नदी येथे पोहण्यासाठी गेला होता. पोहताना त्याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडू लागला. ही बाब त्यांच्या मित्रांना समजताच त्यांनी आरडाओरड केली, तसेच परिसरातील नागरिकांना बोलावले. मात्र, तोपर्यंत साहिल आढळून आला नाही. याबाबतची माहिती लगेच शहर पोलिसांना देण्यात आली. दरम्यान शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीशसिंग राजपूत यांना मिळताच त्यांनी आपल्या चमूसह घटनास्थळ गाठले.

पाण्याबुड्याच्या साह्याने त्याची शोधमोहीम राबवली. यावेळी जवळच त्याचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे विठ्ठल मंदिर व्यायाम शाळा व परिसरात शोककळा पसरली आहे. पुढील तपास शहर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सतीशसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शन सुरू आहे.बॉक्स

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी झाली होती निवडसाहिल हा कबड्डीसह कुस्तीसुद्धा खेळायचा. तो विठ्ठल व्यायम शाळेत कुस्तीचे धडे गिरवत होता. नुकतीच त्याने विदर्भस्तरीय कुस्ती स्पर्धा जिंकली होती. त्यामुळे त्यांची राज्यस्तरीय फेरीसाठी निवड झाली होती. मात्र, त्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मावळल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणे