शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उसनवारी करा; पण विद्यार्थ्यांसाठी दररोज शाळेत शिजवा शालेय पोषण आहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2022 23:18 IST

शिक्षण संचालकाच्या निर्देशानुसार, १५ मार्चपासून शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना आहार शिजवून दिला जात आहे. पुरवठादाराकडून तांदूळ, डाळपुरवठा होईपर्यंत व पर्यायी व्यवस्था होईपर्यंत शिजविलेला आहार द्यायचा आहे. शाळांना १५४ दिवसांकारिता तांदूळ व धान्याचे वाटप करण्यात आले आहे. ते विद्यार्थ्यांना वितरित केले जात आहेत, परंतु वाटप तत्काळ  थांबवून जेव्हा ४३ दिवसांचा धान्यपुरवठा होईल.

रामदास हेमकेलोकमत न्यूज नेटवर्कचिमूर : शाळा सुरू झाल्यानंतर शासनाने शालेय पोषण आहार सुरू केला आहे. शासनाने महागाईचा विचार न करताच, यात तोकडी वाढ केली आणि खाद्यतेलाची खरेदी शाळा स्तरावर करण्याचे निर्देश दिले. आता शाळा स्तरावरूनच शिजविलेला आहार विद्यार्थ्यांना द्यावा, त्याकरिता गरज पडल्यास तिखट, हळद, मोहरी, मीठ, उसनवारीने घ्या, असे निर्देश शिक्षण विभागाकडून शाळांना प्राप्त झाले. या अजब फतव्यामुळे शाळा व्यवस्थापन चांगलेच अडचणीत आले आहे.शिक्षण संचालकाच्या निर्देशानुसार, १५ मार्चपासून शाळा स्तरावर विद्यार्थ्यांना आहार शिजवून दिला जात आहे. पुरवठादाराकडून तांदूळ, डाळपुरवठा होईपर्यंत व पर्यायी व्यवस्था होईपर्यंत शिजविलेला आहार द्यायचा आहे. शाळांना १५४ दिवसांकारिता तांदूळ व धान्याचे वाटप करण्यात आले आहे. ते विद्यार्थ्यांना वितरित केले जात आहेत, परंतु वाटप तत्काळ  थांबवून जेव्हा ४३ दिवसांचा धान्यपुरवठा होईल. त्यानंतर, विद्यार्थ्यांना १५४  दिवसांचे धान्य वाटप करावे, अशा सूचना केल्या आहेत. शाळेतच आहार तयार करण्याकरिता इंधन, भाजीपाला व तेलाची खरेदी शाळा स्तरावर  करण्याची जबाबदारी मुख्याध्यापकावर सोपविल्याने आता शिक्षक व मुख्याध्यापकही पेचात पडले आहेत. 

...अन्यथा संघटना विरोधात आंदोलन छेडेल n शासन प्रशासकीय यंत्रणेचे अपयश झाकण्यासाठी मुख्याध्यापक व शिक्षकांना वेठीस धरत आहे. धान्य इत्यादी वस्तूंचा पुरवठा न करता, मुख्याध्यापक व शिक्षकांना पोषण आहार शिजवून देण्याची सक्ती  पर्यायी व्यवस्थेच्या नावाखाली केली जात आहे. आहार शिजवून देणे शक्य न झाल्यास व त्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापक यांना जबाबदार धरल्यास प्राथमिक व उच्च प्राथमिक सेवा मंडळ संघटनेला विरोधी भूमिका घ्यावे लागेल, असा इशारा संघटनेचे राज्याध्यक्ष अशोक वैद्य यांनी दिला आहे.

 

टॅग्स :SchoolशाळाEducationशिक्षण