शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

साहित्य महोत्सवात ग्रंथ विक्रेत्यांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 6:00 AM

मराठी साहित्य संमेलनाच्या मांदियाळीत विदर्भ साहित्य संघाद्वारे आयोजित संमेलनाला साहित्य चळवळीत महत्त्व आहे. विसासंघाच्या साहित्य संमेलनांनी विविध साहित्य प्रवाहांना सामावून घेण्याचा उमेदपणा दाखविल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे स्थानिक साहित्य संस्थांच्या सहयोगातून साहित्य संमेलने आयोजित करताना विदर्भ साहित्य संघासारखी प्रतिष्ठित संस्था सहभागी झाल्यास सर्वांच्याच अपेक्षा उंचावतात.

ठळक मुद्देवाचकांनी फिरवली पाठ : दर्जेदार संपदा असतानाही अडीच लाखांचीच ग्रंथविक्री

राजेश मडावी।लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : चांदा क्लब चंद्रपूर व विदर्भ साहित्य संघ नागपूरतर्फे चांदा क्लब ग्राऊंडवरील साहित्य संस्कृती महोत्सवादरम्यान रसिकांनी फारशी गर्दी केली नाही. त्यामुळे केवळ अडीच लाखांचीच ग्रंथविक्री झाली. पुणे, सोलापूर, औरंगाबाद सारख्या लांब अंतरावरील ग्रंथ विक्रेत्यांनी स्टॉल्स लावले होते.मराठी साहित्य संमेलनाच्या मांदियाळीत विदर्भ साहित्य संघाद्वारे आयोजित संमेलनाला साहित्य चळवळीत महत्त्व आहे. विसासंघाच्या साहित्य संमेलनांनी विविध साहित्य प्रवाहांना सामावून घेण्याचा उमेदपणा दाखविल्याची उदाहरणे आहेत. त्यामुळे स्थानिक साहित्य संस्थांच्या सहयोगातून साहित्य संमेलने आयोजित करताना विदर्भ साहित्य संघासारखी प्रतिष्ठित संस्था सहभागी झाल्यास सर्वांच्याच अपेक्षा उंचावतात. चंद्रपुरातील संमेलनाला तर थेट सांस्कृतिक महोत्सवाची जोड दिली होती. त्यामुळे गर्दी जमेल अशी ग्रंथ विक्रेत्यांना आशा होती. चार विक्रेत्यांना तर प्रवास खर्चही निघाला नाही. पुस्तकांच्या दुकानातून कापडी कोट विकल्याने बरे झाले, अशी माहिती एकाने दिली. ग्रंथदालनातील एका दुकानातून काहींनी चक्क हळदीची पाकिटे विकत घेतल्याचे पाहून आश्चर्य वाटल्याचे श्रीकांत साव यांनी सांगितले.वैचारिक ग्रंथांना सर्वाधिक पसंतीवाचकांनी ललितऐवजी वैचारिक ग्रंथांची सर्वाधिक खरेदी केली. कथा, कविता, कांदबरी व आत्मकथनाची पुस्तके विकली नाहीत. वर्तमानातील अस्वस्थ प्रश्नांना भेडणारे विषय वाचकांना आकर्षित करत असल्याचे निरीक्षण पुण्याच्या राजहंस प्रकाशनाचे शरद अष्टेकर यांनी नोंदविले.आयोजकांचे चुकले कुठे?सोलापुरातील विजय बुक सर्व्हिसेसचे राजन देडे म्हणाले, संमेलनाची तयारी डौलदार होती. मात्र, शासकीय सरस महोत्सादरम्यान लावलेले स्टॉल्स जैसे थे ठेवून ग्रंथ विक्रेत्यांना वेगळी जागा दिली. सरसच्या जागेवर चहा, नाश्त्याची दुकाने लागली. त्यामुळे बरेच रसिक कार्यक्रम पाहून घेऊन थेट सरस स्टॉलकडेच जायचे. संमेलन, ग्रंथदालन व नाश्ता अशा घटकांना एकत्र ठेवणे शक्य होते. औरंगाबादचे बी. आर. काळे यांनी रसिकांची गर्दी न होण्यामागे संमेलनाचा प्रचार व प्रसार कमी पडला, अशी शंका व्यक्त केली.फिरकले नाहीत विद्यार्थीपुसद येथील विद्याधनचे अशोक गोरे यांनी विद्यार्थ्यांसाठी १२ प्रकारचे नकाशे तयार केले. विद्यार्थ्यांच्या मानसशास्त्राचा कल लक्षात घेऊन निर्मिलेल्या ज्ञानवर्धक शैक्षणिक साहित्याने पालक व शिक्षकांचे लक्ष वेधून घेतले. वाचन लेखनाचे उत्तम संस्कार बालमनावर रूजविण्यासाठी साहित्य संमेलन उत्सव उत्सव असतो. पण संमेलनात पहिला दिवस सोडल्यास मुले फिरकली नाही, अशी खंत गोरे यांनी व्यक्त केली.