शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागातील रुग्णांवर बोगस डॉक्टरांची मलमपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2022 13:15 IST

Bogus Doctor : वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही परवानगी अथवा पदवी नसताना थातूरमातूर केलेल्या वैद्यकीय सेवेच्या भरवशावर तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट

दीपक साबने

चंद्रपूर : जिवती तालुक्यात जिवती व पाटण येथे दोन प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. जिवती प्राथमिक आरोग्य केंद्रात १२ तर, पाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात ६ अशा एकूण १८ उपकेंद्रांचा समावेश आहे. ग्रामीण जनतेचे आरोग्य नीट राहावे. त्यांना आरोग्याची योग्य सेवा मिळावी, यासाठी आरोग्य सेवेची निर्मिती केली आहे. परंतु अपुऱ्या सोई-सुविधा व कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे ग्रामीण जनतेला जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा खासगी रुग्णालयात उपचारासाठी धाव घ्यावी लागत असल्याचे दिसून येत आहे. परिणामी ही संधी पाहून बोगस डॉक्टरांनी आपले बस्तान ग्रामीण भागात पसरवून गरीब जनतेची लूट व त्यांच्या जीवाशी खेळ सुरू केला आहे.

शासकीय प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे उपचारासाठी रुग्ण गेले असता त्या सर्वांना एकसारख्याच गोळ्या देतात. काही उपकेंद्रात कर्मचारीच वेळेवर उपस्थित राहत नाहीत तर, काही ठिकाणी उपचार बरोबर करत नाहीत, अशा नानाविध समस्येमुळे ग्रामीण भागातील गरीब जनता नाईलाजाने बोगस डॉक्टरांकडून उपचार करून घेतात. काहीजण उपचारावर समाधान व्यक्त करतात तर, काही तक्रार. सध्या बदलत्या वातावरणामुळे लोक आजारी पडल्यामुळे खासगी दवाखाने गच्च भरलेले दिसताहेत.

वैद्यकीय क्षेत्रातील कोणतीही परवानगी अथवा पदवी नसताना थातूरमातूर केलेल्या वैद्यकीय सेवेच्या भरवशावर तालुक्यातील ग्रामीण भागात बोगस डॉक्टरांकडून रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. याकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष तर, होत नाही ना?, असा सवाल उपस्थित होत आहे. तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे सर्व सोयी सुविधा व कर्मचारी उपलब्ध करून द्यावे व स्वंयघोषित बोगस डॉक्टर यांच्याकडून जीवाशी होणाऱ्या खेळाला व जनतेच्या लुबाडणुकीला ब्रेक लावावा, अशी जनतेकडून मागणी होत आहे.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टर