शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शाळेसमोरच ठेवला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 00:08 IST

येथील फेअरीलँण्ड स्कूलमधील व आदिवासी वसतिगृहात निवासी असलेल्या एका आदिवासी विद्यार्थिनीचा आजाराने नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचा मृत्यू वसतिगृहाचे अधीक्षक व शाळेचे संचालक यांच्या निष्काळजीपणाने झाला.

ठळक मुद्देतणावाचे वातावरण : निष्काळजीपणामुळे विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : येथील फेअरीलँण्ड स्कूलमधील व आदिवासी वसतिगृहात निवासी असलेल्या एका आदिवासी विद्यार्थिनीचा आजाराने नागपूरच्या मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिचा मृत्यू वसतिगृहाचे अधीक्षक व शाळेचे संचालक यांच्या निष्काळजीपणाने झाला. त्यामुळे त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून अटक करा, या मागणीसाठी विद्यार्थिनीचे पालक व आदिवासी संघटनेचे नेते रमेश मेश्राम यांच्या नेतृत्वात शनिवारी शाळेच्या प्रवेशद्वारासमोर विद्यार्थिनीचा मृतदेह ठेवून निदर्शने करण्यात आली.या घटनेने याठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले. तब्बल सहा तासानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने व चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. त्यानंतर मृतदेह उत्तरीय तपाासणीकरिता पाठविण्यात आला.आचल सिताराम कुळमेथे (१४) रा. मांगली रै. असे मृतक विद्यार्थीनीचे नाव असून ती गेल्या तीन वर्षांपासून वसतिगृहात राहून फेअरीलँण्ड स्कूल येथे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण घेत होती. ती आठव्या वर्गाची विद्यार्थिनी होती. गेल्या पाच दिवसांपासून तिची प्रकृती बरी नसल्याने अधीक्षक व शाळेच्या संचालकांनी तिच्यावर स्थानिक खासगी दवाखान्यात उपचार केला. तिची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर तिच्या पालकांना सूचना देण्यात आली. त्यानंतर आचलला नागपूर येथील मेयोमध्ये दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान शुक्रवारी आचलचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला येथील अधीक्षक व शाळेचे संचालकच जबाबदार आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच मुलीचा मृत्यू झाला, असा आरोप मुलीचे पालक सिताराम कुळमेथे व त्यांचे नातेवाईक तसेच आदिवासी संघटनेचे रमेश मेश्राम यांनी केला व आचलचा मृतदेह शाळेच्या समोर ठेवून आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत आरोपींना अटक करणार नाही, तोपर्यंत मृतदेह उचलणार नाही, असा पावित्रा घेतल्याने हे प्रकरण आणखीच चिघळले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुका दंडाधिकारी महेश शितोळे, उपविभागीय पोलीस अधीकारी प्रताप पवार, निवासी नायब तहसीलदार मधुकर काळे यांच्यासह पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले. त्यानंतर जमाव शांत झाला.आचलचा मृत्यू आजारामुळेच -युवराज धानोरकरफेअरीलँण्डचे स्कूलचे अध्यक्ष अ‍ॅड. युवराज धानोरकर यांना विचारणा केली असता माझ्या शाळेतील वसतिगृहात गडचिरोली, भामरागड, चिमूर व चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील ३६० विद्यार्थी असून मृतक आचल ही तालुक्यातील मांगली रै. येथील होती. तिची प्रकृती बरी नसल्याचे आमच्या लक्षात आले होते. तिच्यावर भद्रावती येथील खासगी दवाखान्यात उपचार केला. परंतु तिची प्रकृती खालावत असल्याचे लक्षात आल्याने तिच्या पालकास याबाबत सूचना करून तिच्यावर चांगल्या दवाखान्यात उपचार करा, असा सल्ला देवून तिला त्यांच्या स्वाधीन केले. आचलवर केलेल्या उपचाराचे पेपर्स आमच्याकडे आहे. आम्ही उपचारासाठी कोणतीही हयगय केली नसल्याचे धानोरकर यांनी सांगितले.

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यू