सावरगाव : नागभीड तालुक्यातील वाढोणा येथील जगदंब युवा ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून रक्तदान व आरोग्य शिबिर घेण्यात आले.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल डोर्लीकर व डॉ.शीतल गायकवाड यांच्या हस्ते पार पडले. अध्यक्षस्थानी सरपंच देवेंद्र गेडाम होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच भगवान बन्सोड, ग्रा.पं. सदस्य प्रदीप येसनसुरे, अनिल डोर्लीकर, प्रियंका गंजेवार, वासुदेव मस्के, मीनाक्षी कोमावार, रामेश्वर लंबेवार, शशिकला ठाकरे आदींची उपस्थिती होती. रक्तदान शिबिर झाल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचारी सहायक फौजदार खुशाल नारायण बोरकर, पोलीस पाटील हरिहर घोनमोडे, पोस्टमास्तर नरेंद्र दहीकर, तसेच भारतीय सैन्य दलात निवड झालेल्या चार युवकांचा आणि गावातील गोरक्षक असलेलेले रमेश वाघाडे, वासुदेव राऊत, सुरेश वाघाडे यांचाही सत्कार करण्यात आला.