शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
2
आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
3
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
4
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
5
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
6
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
7
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
8
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
9
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
10
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
11
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
12
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
13
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
14
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
15
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
16
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
17
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!
18
पोत्यातून निघाल्या नोटाच नोटा! भीक मागणाऱ्या महिलेकडे सापडला 'खजिना'; आतापर्यंत किती मोजल्या?
19
Viral Video: जुना, तुटलेल्या टीव्हीचा बनवला हेल्मेट; तरुणाचा जुगाड पाहून नेटकरी शॉक!
20
ICC Womens World Cup 2025 : ठरलं! नवी मुंबईत भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार सेमीफायनल

चंद्रपूर जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा; नोकरभरती काँग्रेसला भोवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 14:05 IST

Chandrapur : अध्यक्षपदी रवींद्र शिंदे, तर उपाध्यक्षपदी संजय डोंगरे यांची बिनविरोध निवड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अनेक वर्षांपासून असलेली काँग्रेसची सत्ता उलथवून भाजपने पहिल्यांदाच बँकेवर झेंडा फडकावला आहे. मंगळवारी (दि. २२) जिल्हा बँकेच्या सभागृहात झालेल्या संचालकांच्या सभेत भाजपच्या गोटातील संचालक रवींद्र शिंदे यांची अध्यक्षपदी, तर संजय डोंगरे यांची उपाध्यक्षपदी अविरोध निवड झाली. काँग्रेसचे खासदार व नवनिर्वाचित संचालक प्रतिभा धानोरकर यांनी या निवड सभेला गैरहजर राहणे पसंत केले.

भाजपने चिमूरचे आमदार कीर्तिकुमार ऊर्फ बंटी भांगडिया यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली. त्यांना चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांची साथ लाभली. हा विजय म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमदार भांगडियांकडून वाढदिवसाचे 'स्पेशल गिफ्ट' असल्याचे बोलले जात आहे. सकाळी ११ वाजता सहलीवरून परतलेल्या संचालकांनी बँकेच्या सभागृहात प्रवेश केल्यानंतर अध्यक्षपदासाठी रवींद्र शिंदे आणि उपाध्यक्षपदासाठी संजय डोंगरे यांनी नामांकन दाखल केले. काँग्रेसकडून कोणतेही नामांकन न आल्याने ही निवड अविरोध झाली. आमदार भांगडिया आणि जोरगेवार यांनी शिंदे यांना अध्यक्षाच्या खुर्चीवर बसवून पदाची सूत्रे सोपविली. काँग्रेसकडे १२ संचालक असूनही त्यातील काहीजण भाजपशी जवळीक साधल्याने त्यांचा खेळ बिघडला. दुसरीकडे, आ. भांगडिया यांचे राजकीय डावपेच भाजपसाठी उपयोगी ठरले. विशेष म्हणजे, अध्यक्ष रवींद्र शिंदे हे सुरुवातीला काँग्रेस गोटात होते. मात्र शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून काँग्रेसला धक्का दिला. काँग्रेसकडे असलेले संचालकच फितूर निघाल्याने काँग्रेसचा खेळ खल्लास झाल्याची चर्चा आहे.

नोकरभरती काँग्रेसला भोवलीनिवडणुकीपूर्वी संतोषसिंह रावत यांच्या कार्यकाळात बँकेत ३५८ जागांसाठी नोकरभरती घेण्यात आली. या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. बँकेची निवडणूक झाल्यानंतर भरतीप्रकरणी काँग्रेस गोटातील काही नवनिर्वाचित संचालकांना ईडीची नोटीस गेल्याची चर्चा आहे. आता कारागृहाची हवा खावी लागेल, या भीतीने संचालकांनी नांगी टाकल्याची चर्चा आहे.

बंटी भांगडिया खरे 'किंगमेकर'आमदार बंटी भांगडिया यांनी जिल्हा बँकेची निवडणूक मनावर घेतली होती. पहिल्या दिवसापासून त्यांनी बांधलेली मोट अध्यक्षनिवडीपर्यंत कायम होती. भांगडिया यांनी खऱ्या अर्थाने या निवडणुकीत 'किंगमेकर'ची भूमिका पार पाडली. सर्व संचालकांना सोबत घेऊन बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे हित साधणार असल्याची प्रतिक्रिया आमदार भांगडिया यांनी दिली.

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरbankबँक