मुख्यमंत्री पेयजल योजना : विसापुरातून होणार १८ गावांना पाणी पुरवठालोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : ग्रामीण भागातील जनतेला पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी महत्त्वाकांक्षी योजना निर्माण करण्याची प्रेरणा देणारे आणि त्यासाठी भरीव आर्थिक पाठबळ देणारे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यात मुख्यमंत्री पेयजल योजनांचे भुमीपूजन करायला मिळणे हा आनंदाचा क्षण असल्याचे प्रतिपादन पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. ते मूल व बल्लारपूर तालुक्यातील ८२ कोटींच्या पाणी पुरवठा योजनांचे भूमिपूजन करताना बोलत होते. ग्रामीण भागातील नागरिकांना शुध्द पाणी पुरवठा व्हावा यासाठी वर्षभरापूर्वी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल योजना सुरु करण्यात आली. या योजनेअंतर्गत अनेक ठिकाणी योजना मंजूर झाल्या. मात्र मंजूर झालेल्या योजनांच्या प्रत्यक्ष कामास चंद्रपूर जिल्ह्यातून बुधवारी सुरुवात झाली. राज्याचे वित्त, नियोजन व वनेमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या योजनेसाठी पुढाकार घेतला होता. मूल येथे मारोडा तर बल्लारपूर तालुक्यातील विसापूर येथे दोन वेगवेगळया योजनांचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला वन विकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, जि.प. चे अध्यक्ष देवराव भोगळे, बल्लारपूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष हरिष शर्मा, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापडकर, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, महाराष्ट्र जिवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता विजय जगतारे आदी उपस्थित होते. तत्पूर्वी कार्यक्रमाच्या सुरुवातीला मोफत गॅस वाटप योजने अंतर्गत लाभार्थ्यांना गॅस कनेक्शनचे प्रातिनिधिक वितरण केले.मुख्यमंत्री पेयजल योजना महाराष्ट्रात पुढील दोन वर्षात पूर्ण करायाच्या असून बल्लारपूर येथील योजनाही पुढील १८ महिण्यात विक्रमी वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन ना. बबनराव लोणीकर यांनी केले. राज्य शासनाने सुरु केलेल्या शेततळे, अपघात विमा योजना, फळबाग आदी विविध कल्याणकारी योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे, आवाहनही त्यांनी यावेळी केले.यावेळी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही मार्गदर्शन करून जिल्हा विकासाला निधी कमी न पडू देण्याचे आश्वासन दिले.
८२ कोटींच्या पाणी पुरवठा योजनांचे भूमिपूजन
By admin | Updated: May 26, 2017 00:28 IST