शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मातीच्या उत्खननासाठी तहसीलदाराने खाल्ली लाचेची माती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 12:02 IST

मातीच्या उत्खनन आणि वाहतुकीचा परवाना देण्यासाठी तहसीलदाराने १ लाख रुपयांची लाच मागितली. बरीच घासाघीस केल्यानंतर २५ हजारांवर तडजाेड झाली. ही लाच द्यायची नसल्याने वीटभट्टीधारकाने थेट नागपूर येथील एसीबीच्या कार्यालयात धाव घेतली.

ठळक मुद्दे२५ हजारांची लाच घेताना तहसीलदार नीलेश खटके जेरबंद नागपूर एसीबीची भद्रावतीत कारवाई

चंद्रपूर/ नागपूर : शेतातील मातीचे उत्खनन आणि वाहतुकीच्या परवान्यासाठी २५ हजारांची लाच स्वीकारताना तहसीलदार डाॅ. नीलेश निवृत्ती खटके (वय ३६) यांना रंगेहाथ पकडण्यात आले. भद्रावतीच्या तहसील कार्यालयात शनिवारी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास नागपूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

तक्रारदार चंद्रपूर जिल्ह्यातील चिरादेवी सुठाणा (ता. भद्रावती) येथील रहिवासी आहे. त्यांचा वीटभट्टीचा व्यवसाय आहे. त्यासाठी त्यांना स्वत:च्या शेतातून ३०० ब्रास मातीचे उत्खनन करायचे होते. त्याकरिता यांनी भद्रावती तहसील कार्यालयात रीतसर अर्ज करून रॉयल्टी तसेच अन्य शासकीय शुल्कापोटी ८८,२५६ रुपये जमा केले होते. त्यानंतर त्यांनी तहसीलदार नीलेश निवृत्ती खटके यांची भेट घेऊन मातीच्या उत्खनन आणि वाहतुकीच्या परवान्याची मागणी केली.

हा परवाना देण्यासाठी तहसीलदार खटके यांनी १ लाख रुपयांची लाच मागितली. बरीच घासाघीस केल्यानंतर २५ हजारांवर तडजाेड झाली. ही लाच द्यायची नसल्याने वीटभट्टीधारकाने थेट नागपूर येथील एसीबीच्या कार्यालयात धाव घेतली. शुक्रवारी १० डिसेंबरला त्यांची तक्रार नोंदवून घेतल्यानंतर शहानिशा करण्यात आली. दरम्यान, चंद्रपुरातून कारवाईचा सापळा लावल्यास लिक होण्याची भीती असल्याने एसीबीचे अधीक्षक राकेश ओला यांनी नागपुरातून शनिवारी भल्या सकाळी कारवाईसाठी पथक पाठविले.

तहसील कार्यालयात सकाळी ११.३० च्या सुमारास तक्रारदाराकडून तहसीलदार खटके यांना २५ हजार रुपये स्वीकारताच एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. नंतर भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एसीबीचे अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक योगिता चापले, नायक रविकांत डहाट, अनिल बहिरे, निशा उमरेडकर, पोलीस शिपाई अमोल मेंगरे यांनी ही कारवाई केली.

तलाठी, मंडळ अधिकाऱ्यानंतर तहसीलदार जाळ्यात

भद्रावती तालुक्यात भ्रष्टाचार वाढल्याने यंदाच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या कारवायांतून दिसून येते. वर्षभरात भद्रावती महसूल विभागातील तलाठी, मंडळ अधिकारी आणि आता तहसीलदार यांना लाचेची रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरण