लोकमत न्यूज नेटवर्कभद्रावती : भद्रावती शहरात अद्ययावत भाजी मार्केट व व्यापारी संकूल उभारले जाणार आहे. भद्रावती पालिकेने याचे नियोजन केले आहे.राज्याचे गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजनही पार पडले. याप्रसंगी आ. बाळू धानोरकर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी गिरीष बन्नोरे, उपाध्यक्ष प्रफुल चटकी, मध्यवर्ती बँकेचे संचालक रवींद्र शिंदे उपस्थित होते.१२ कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या या भाजीमार्केट व व्यापारी संकुलाला शासनाकडून सहा कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. बेसमेंट व पहिल्या ग्राऊंड फ्लोअरचे काम चालू झाले असून आठ ते दहा महिन्यात काम पूर्णत्वाला जाईल. भाजी मार्केट संबंधित यापूर्वीचे जे व्यापारी होते, त्यांना पहिले गाळे दिल्या जाणार असून नंतर उर्वरित गाळ्यांचा लिलाव होणार आहे. भाजी मार्केट व व्यापारी संकुलात जवळपास १५० गाळे असणार आहे. ठोक भाजीपाला व्यापाºयांसाठी तळमजल्यात १५ गाळे, भाजीमार्केटसाठी ग्राऊंड फ्लोअरवर ७० गाळे, पहिल्या फ्लोअरवर ५० गाळे व दुसºया फ्लोअरवर कार्यालयीन सभागृह तथा बँकेसाठी सात गाळे ठेवण्यात येणार आहे. फळ विक्रेत्यांनाही गाळे देण्यात येणार आहे तसेच पहिल्या फ्लोअरवर भाजी व्यतीरिक्त व्यवसाय करणाºयांना दुकान गाळे दिले जाणार आहे. दोन लिफ्टची व्यवस्था करण्यात येणार असून तळमजल्यात मालवाहू ट्रक सरळ जाण्याची व्यवस्था करण्यात येईल.
भद्रावतीत अद्ययावत भाजी मार्केट, व्यापारी संकुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 23:31 IST
भद्रावती शहरात अद्ययावत भाजी मार्केट व व्यापारी संकूल उभारले जाणार आहे. भद्रावती पालिकेने याचे नियोजन केले आहे.
भद्रावतीत अद्ययावत भाजी मार्केट, व्यापारी संकुल
ठळक मुद्देदीडशे गाळे बांधणार : गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रारंभ