भद्रावती : भद्रावती नगर परिषदेने जिल्हा परिषद हायस्कुल भद्रावती येथे भद्रावती भूषण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये प्राविण्यप्राप्त विद्यार्थी व मान्यवरांचा अनुक्रमे सन्मानपत्र व भद्रावती भूषण पुरस्कार आ. बाळू धानोरकर, तहसिलदार सचिन कुमावत, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, मुख्याधिकारी विनोद जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी न.प.चे पदाधिकारी प्रमोद गेडाम, सुधीर सातपुते, विनोद वानखेडे, संदीप वडाळकर, प्रशांत झाडे, प्रमोद नागोसे, मिनल आत्राम, माया नारळे, शारदा ठवसे व नालंदा पाझारे हे उपस्थित होते. यावेळी आ. बाळू धानोरकर यांनी नागरिकांना संबोधित केले. ते म्हणाले, भद्रावती शहराचे नाव लौकीक करणारे कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात यावे. याकरिता लागणारे सहकार्य वेळोवेळी मी करीत राहीन. अध्यक्ष अनिल धानोरकर यांनी भद्रावती शहरातील विशेष प्राप्ती करणाऱ्यांनाच नगरपरिषदेकडून गौरविण्यात येते. मुख्याधिकारी, यांनी हागणदारी मुक्त शहर करण्याकरिता ज्या नागरिकांकडे शौचालय नाही, अशा नागरिकांनी त्वरित नगर परिषदेकडे अर्ज करून शौचालय उपलबध करून घेण्याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये वर्ग ४ था शिष्यवृत्ती परीक्षा प्रथम अमोशिनी मंगल कृष्णपल्लीवार, जि.प. उच्च प्राथ. शाळा गवराळा, द्वितीय चिराग विनोद मोतेकर, जि.प. उच्च प्राथ. शाळा गवराळा वर्ग १० वा, प्रथम कुमारी श्वेता प्रकाश पोटे, सेंट अॅनस हायस्कूल भद्रावती, द्वितीय तेजश्री मुकुंद बोंदरे, आॅर्डनन्स फॅक्टरी हायर सेकंडरी स्कुल ओ.एफ. चांदा व हर्षा यशवंत वाघ, यशश्री संजय नैताम या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)
भद्रावती नगर परिषदतर्फे भद्रावती भूषण
By admin | Updated: February 2, 2016 01:17 IST