शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

सावधान ! सोशल मीडियावर फसव्या योजनांची लिंक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2024 13:29 IST

नागरिकांची दिशाभूल : लिंक ओपन करणे महागात पडणार

दीपक साबणे लोकमत न्यूज नेटवर्क जिवती : आधुनिक तंत्रज्ञान सर्वसामान्य माणसांत दृढ होऊन कामात होणारी दिरंगाई थांबविण्यासाठी, तसेच कामात पारदर्शकता आणण्यासाठी शासकीय स्तरावरून अधिक भर दिला जात असला तरी अलीकडच्या काळात तंत्रज्ञानाचा विपर्यास करून सोशल मीडियावर अनेक फसव्या योजनांची लिंक टाकून नागरिकांची फसवणूक केली जात आहे. नागरिकांनी अशा कोणत्याही लिंकवर क्लिक करू नये.

मागील अनेक दिवसांपासून अनुदान योजनांच्या संकेतस्थळांनी व्हॉट्सअॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. मोबाइल, लॅपटॉप, सौर पॅनल यासारखी आमिषे दाखविणाऱ्या फसव्या योजनांची लिंक पाठविली जात असून, त्यामुळे अनेक नागरिकांची दिशाभूल होत आहे.

या माध्यमातून ग्राहकांची वैयक्तिक फसवणूक होत आहे. सध्या सोशल मीडियावर प्रधानमंत्री घरकुल योजना, तसेच प्रधानमंत्री सन्मान किसान योजना यामधील लाभार्थ्यांची यादी बघून घ्या म्हणून एक लिंक सोशल मीडियावर व्हायरल होऊन चांगलाच धुमाकूळ घालत आहे. ही लिंक ओपन करताच अनेकांचे मोबाइल हँग होत आहेत. याशिवाय काही व्यक्तींच्या मोबाइलमधून त्यांचा डेटा चोरीला जात आहे. त्यामुळे त्यांच्या बँक खात्याला धोका होण्याचे संकेत आहेत. शासकीय कार्यालयापासून तर ग्राम प्रशासनापर्यंत डिजिटल तंत्रज्ञानाची अंमलबजावणी केली जात आहे. मात्र, नागरिकांना कुठल्याही योजनांचा लाभ घेण्यासाठी संगणकीकृत ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करून दस्तऐवजांची पूर्तता करावी लागते. सोशल मीडियावर फिरणाऱ्या ज्या काही फसव्या योजनांच्या लिंक व्हायरल होत आहेत, त्या लिंक अगोदर सुरू करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी लागते. नोंदणी झाल्यानंतर दोन ते तीन प्रश्नांतून अर्जदाराची मते सोशल मीडियाद्वारे जाणून घेतली जातात. त्यानंतर दहा मित्रांना या योजनांच्या माहितीची लिंक पाठविण्याची अट घातली जाते. मात्र, असे करूनही अर्जदाराला कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही. उलट या फसव्या योजनांच्या माहितींना नागरिक बळी पडल्यामुळे त्यांचे नुकसान होते. 

फसव्या लिंक दिसताच डिलिट करा सध्या सोशल मीडियावर प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना यादी, घरकुल योजना, मोबाइल, लॅपटॉप, तसेच आपला परिवार जोडा आणि अडीच लाख रुपये मिळवा, अशी माहिती देणारी लिंकसुद्धा व्हायरल झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही फसव्या लिंक सुरू न करता थेट डिलिट करून घ्याव्यात आणि अशा फसव्या लिंकपासून सावध असावे, असे आवाहन पोलिसांनीही केले आहे.

"आजकाल .apk एक्स्टेन्शन नावाच्या फाईल पाठवल्या जात आहेत. त्या फाइल इंस्टॉल करू नये. या फाइल इंस्टॉल करताच क्षणात मोबाइलचा ताबा फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगाराच्या ताब्यात जाऊन बँक खाते रिकामे होते. शिवाय मोबाइलमधील तुमचा खाजगी डेटाही चोरीला जाऊ शकतो. प्ले स्टोअर किंवा अॅपल स्टोअरवर खात्रीशीर अॅप असतात. मात्र, थेट लिंक, टेलिग्राम किवा व्हॉटस्अॅप ग्रुपवर आलेल्या अश्शत Apk फॉरमॅटमधील फाइल असुरक्षित असतात. पडताळणी न झालेल्या लिंक ओपन करू नये." - कांचन पांडे, ठाणेदार पोलिस स्टेशन, जिवती 

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाchandrapur-acचंद्रपूर