शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

मुनगंटीवारांच्या प्रयत्नामुळेच लोकचळवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:07 IST

हल्लीच्या राजकारणात बघायला न मिळणारा सच्चेपणा, प्रामाणिक प्रयत्न आणि एखाद्या विषयाबद्दल प्रचंड पाठपुरावा या गुणांमुळे राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या वृक्षलागवडीच्या चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप आले आहे.

ठळक मुद्देअनिल सोले यांचे वृक्षलागवडीसंदर्भात वक्तव्य : वृक्षदिंडीला उत्साहात प्रारंभ, हजारोंचा उत्स्फूर्त प्रतिसाद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : हल्लीच्या राजकारणात बघायला न मिळणारा सच्चेपणा, प्रामाणिक प्रयत्न आणि एखाद्या विषयाबद्दल प्रचंड पाठपुरावा या गुणांमुळे राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सुरू केलेल्या वृक्षलागवडीच्या चळवळीला लोकचळवळीचे स्वरूप आले आहे. सुरुवातीला हजार प्रश्न विचारणारे विरोधकही आता या चळवळीमध्ये स्वयंप्रेरणेने सहभागी झाले आहे. वसुंधरेला हिरवा शालू चढविणाऱ्या या मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद १३ कोटींचे लक्ष्य निश्चित पूर्ण करेल, असा विश्वास ग्रीन आर्मी फाऊंडेशनचे प्रमुख व वृक्षदींडीचे प्रणेते आमदार प्राध्यापक अनिल सोले यांनी व्यक्त केला.चंद्रपूर वनविभागाच्या उत्स्फूर्त सहभागात सोमवारी जिल्ह्यातील वृक्षदिंडीला हजारो नागरिकांची साथ मिळाली. प्राध्यापक अनिल सोले यांच्या नेतृत्वात गेल्या तीन वर्षांपासून सतत वृक्षदिंडी सुरू आहे. सोमवारी चंद्रपूरमध्ये वृक्षदिंडीला शासकीय विभागासह अनेकांचा प्रतिसाद मिळाला. यावेळी आमदार प्रा. अनिल सोले, आ. नाना श्यामकुळे, आ. रामदास आंबटकर, महापौर अंजली घोटेकर, जिल्हाधिकारी आशुतोष सलिल, जिल्हा परिषदेचे सभापती ब्रिजभूषण पाझारे, मुख्य वनसंरक्षक विजय शेळके, उपवनसंरक्षक गजेंद्र हिरे, विभागीय वनाधिकारी अशोक सोनकुसरे, सुनील कुमार, प्रकाश धारणे, प्रशांत कांबळे, समन्वयक अभय बडकल्लेवार आदी उपस्थित होते.शहरातील मुख्य रस्त्यांवर सकाळी ९ वाजतापासून सुरु झालेली वृक्षदिंडी चंद्रपूरच्या गांधीनगर चौकाला वळसा घालत मुख्य वनसंरक्षक कार्यालयामध्ये विसर्जित झाली. या ठिकाणी मान्यवरांनी संबोधित केले. आ. अनिल सोले पुढे म्हणाले, जागतिक स्तरावर सध्या जंगलाचे पुनर्जीवन करण्याबाबत अतिशय सकारात्मक मत तयार होत आहे. महाराष्ट्रामध्येसुद्धा वाळवंट बनण्यापासून वाचण्यासाठी याची गरज आहे.वृक्षलागवडीबाबत यापूर्वी जनतेला प्रश्न अधिक पडायचे. तीन वर्षांपूर्वी वृक्षलागवडीच्या संदर्भात अनेकांना प्रश्नांची उत्तरे द्यावी लागत होती.मात्र ना. सुधीर मुनगंटीवार यांनी ज्या तन्मयतेने, ज्या आत्मियतेने या मोहिमेमध्ये स्वत:ला झोकून दिले आणि पाठपुरावा घेतला. त्यानंतर मात्र सर्व राज्यभर चित्र बदलले असून हा एक प्रामाणिकपणे काम करणारा वनमंत्री असून वृक्षलागवडीसारख्या जनतेच्या हिताच्या मोहिमेमध्ये आपण सर्वांनी सहभागी झालेच पाहिजे, असे मत महाराष्ट्रभर जनतेचे तयार झालेले आहे. आणि त्यामुळेच चांदा ते बांदा या योजनेला मोठ्या प्रमाणात यश मिळत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.वृक्ष दिंडीची जेव्हा कल्पना ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यापुढे मांडली. त्यावेळी त्यांनी लोकसहभागाची योजना असल्याचे जाहीर केले होते. आणि त्यामुळेच या मोहिमेला आणि दिंडीचे स्वरूप दिले असल्याचे त्यांनी सांगितले.उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्ष लागवड- आंबटकरआमदार रामदास आंबटकर यांनीदेखील यावेळी संबोधित केले. त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून सुरू असलेल्या या चळवळीमुळे वृक्षलागवड ही आता जनचळवळ झाल्याचे मान्य केले. उद्दिष्टापेक्षा अधिक वृक्षलागवड केली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आ. श्यामकुळे यांनीही मार्गदर्शन केले.दिंडीने वेधले लक्षसकाळी रामबाग येथील वनविभागाच्या विश्रामगृहावरुन शहरातील वृक्षदिंडीला सुरुवात झाली. जवळपास अडीच ते तीन तास शहराच्या विविध भागांमध्ये वृक्षदिंडीने प्रवास केला. यावेळी पालखीमध्ये सजवलेले वृक्ष, त्यामागे पथनाट्यातील कलाकार, भजनी मंडळ आणि एकच लक्ष तेरा कोटी वृक्ष अशी घोषणा देणाºया शाळकरी विद्यार्थ्यांनी नागरिकांचे लक्ष या वृक्षदिंडीने वेधून घेतले होते.