शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

संकटावर मात करीत शेतकरी मशागतीत व्यस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 00:16 IST

सध्या शेतीच्या कामात शेतकरी व्यस्त असून खरीप हंगामासाठी शेती सज्ज करीत आहेत. ही सर्व कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात असून बैलांचा वापर मागे पडला आहे.

ठळक मुद्देबैलबंडीऐवजी शेतकरी करीत आहेत ट्रॅक्टरचा वापर : दुष्काळ, चाराटंचाईच्या छायेत जिल्ह्यातील शेतकरी

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : सध्या शेतीच्या कामात शेतकरी व्यस्त असून खरीप हंगामासाठी शेती सज्ज करीत आहेत. ही सर्व कामे ट्रॅक्टरच्या सहाय्याने केली जात असून बैलांचा वापर मागे पडला आहे.सततची नापिकी, सातत्याने राहत असलेले ढगाळ वातावरण, सरपणाची व्यवस्था, नागरणी, आदी कामे उरकविण्याच्या बेतात शेतकरी आहे. गुढीपाडव्यापासून नव्या आर्थिक वर्षाला सुरुवात करणाऱ्या बळीराजापुढे आर्थिक संकट उभे असले तरी शेतीची मशागत पुन्हा त्याच जोशाने सुरु केली असली तरी पुढील हंगामाच्या नियोजनाची काहीशी चिंता शेतकऱ्यांना आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागातील काही शेतकºयांजवळ बैलजोडी नाही. त्यामुळे ट्रॅक्टरच्या सहाय्याने कपाशीची वाळलेली रोपटे काढण्याचे काम सुरू असून शेताची नागरणी ट्रॅक्टरद्वारे केली जात आहे. यंत्रामुळे रोटावेटर, कल्टीवेटर आदी कामे करून तापत्या उन्हामुळे जमिनीची पोत कायम रहात असल्याचा समज आहे. शेतातील तण वेचणीची कामे सकाळच्या प्रहारात उरकविण्याचा सपाटा सुरू आहे. मुग नक्षत्राला अजून दोन महिन्यांचा कालावधी असल्याने कामे उरकवून लग्नकार्यात सहभागी होण्यासाठी उसंत मिळणार आहे. सिंचनाची सोय असलेल्या शेतात काही शेतकºयांनी पालेभाज्या, लावल्या असून वाढलेल्या पालेभाज्या रखरखत्या उन्हामुळे अडचणीत सापडला आहे.बैलांच्या किंमती वाढल्याबैलांच्या किंमती महागल्याने बैलांची खरेदी कमी झाली आहे. शेती असणारे शेती करीत नाही, त्यामुळे शेतकामासाठी बैलजोडी किरायाने घ्यावी लागते. यासाठी मोसम पाहून जास्तीचे पैसेही वेळ प्रसंगी देऊन ही कामे उरकली जात आहे.पेरणीचे नियोजनयेणाºया खरीप हंगामाला सामोरे जात असताना पारंपरिक पिकांनी सतत तीन वर्षांपासून पाठ फिरविल्याने व योग्य भाव मिळत नसल्याने कोणते पीक घ्यावे या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. अनेकजण वेगळी पिके घेताना दिसत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती