लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : शहरातील गुरूनानक कॉलेज ऑफ सायन्स परिसरात आलेल्या अस्वलाला वन विभागाच्या पथकाने बेशुद्ध करून जेरबंद केले. ही घटना मंगळवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.गुुरूनानक कॉलेज ऑफ सायन्स परिसरात अस्वल शिरल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांना मिळाली. अस्वलाला बघण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. लोकांना बाजूला करून अस्वल दडून असलेल्या झुडुपाच्या सभोवताल जाळी लावून सुरक्षित केले. दरम्यान हे अस्वल एका पडक्या घरावरही चढले होते. रॅपिड रिस्पॉन्स टिमला पाचारण केले. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांनी सदर अस्वलावर डॉट मारून बेशुद्ध करण्याची कार्यवाही सुरू केली. अथक परिश्रमानंतर सकाळी ९ वाजताच्या सुमारास पथकाला यश मिळाले. त्यानंतर अस्वलाला पिंजऱ्यात जेरबंद करून सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. यावेळी वन विभागाचे भोवरे, विरूटकर, कांबळे, सुखसे, टेकाम आदी उपस्थितीत होते. गावात वन्यप्राणी शिरल्यास नजिकच्या वनाधिकाऱ्यांनी तात्काळ माहिती देण्याचे आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी थिपे यांनी केले.
बल्लारपुरात अस्वल शिरल्याने खळबळ; बेशुद्ध करून जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 10:37 IST
शहरातील गुरूनानक कॉलेज ऑफ सायन्स परिसरात आलेल्या अस्वलाला वन विभागाच्या पथकाने बेशुद्ध करून जेरबंद केले. ही घटना मंगळवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडली.
बल्लारपुरात अस्वल शिरल्याने खळबळ; बेशुद्ध करून जेरबंद
ठळक मुद्देवन विभागाने सोडले सुरक्षित जंगलात