शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ! प्लांटमधून होताहे घराघरांत विषारी वायूची ‘एन्ट्री’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2022 05:00 IST

रामदेवबाबा प्लांट हा भुतीनाला जवळ असल्याने येथील प्रदूषित तथा रासायनिक पाणी हे या भुतीनाल्यामध्ये प्रवाहित करण्यात येते. यामुळे जल प्रदूषणसुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप भर्रे यांनी केला आहे. भुतीनाल्याचे पाणी हे जनावरे तसेच शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. मात्र तेथील पाणी प्रदूषित होत असल्याने जनावरांना पिण्यायोग्य नाही. तसेच भुतीनाल्याधील पाणीपुरवठा हा ग्रामीण भागात होत असल्याने भविष्यात येथील रासायनिक पाण्याने अनेक दुर्धर आजार होण्याची शक्यता महेश भर्रे यांनी वर्तविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : बोरगाव रोडवरील रामदेवबाबा साल्वंट प्लांटमधून मोठ्या प्रमाणात जीव घेणारा विषारी वायू पसरत आहे. या प्लांटमधून निघणाऱ्या धुरामधून तेलकट पदार्थ, कण व विषारी पदार्थ ब्रह्मपुरी शहर व आजूबाजूच्या गावांमध्ये उत्सर्जित होत असल्याने परिसरातील अनेक घरांमध्ये काळा तेलकट थर जमा होत आहे.  घरामधील वाहनावर हा थर दिसून येतो. नागरिकांना या विषारी वायूमुळे श्वसनाचे आजार बळावण्याची शक्यता आहे. भविष्यात हा प्लांट अनेक नागरिकांना आजाराचे निमंत्रण देणार आहे. त्यामुळे ब्रह्मपुरी-बोरगाव रोडवर असलेल्या रामदेवबाबा साल्वंट प्लांट तत्काळ बंद करण्याची मागणी  ब्रम्हपुरी नगरपरिषद नियोजन सभापती महेश भर्रे यांनी केली आहे.  सदर प्लांटच्या आजूबाजूला उदापूर, नवेगाव, बोरगाव, झिलबोडी, परसोडी, मालडोंगरी, चिंचोली आदी गावे असून ब्रम्हपुरी नगरपरिषद क्षेत्रात असलेले ज्ञानेशनगर, पेठवार्ड, टिळकनगर, धुमनखेडा आदी परिसर येतात.               या प्लांटच्या विषारी वायूमुळे वरील परिसरातील लोकवस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना झळ बसत आहे. या प्लांटच्या वायू प्रदूषणाची मात्रा प्रदूषण विभागाने त्वरित तपासणी करावी, अशी मागणी सभापती महेश भर्रे यांनी केली आहे. विशेष म्हणजे रामदेवबाबा प्लांटमध्ये अनेक ठिकाणी प्रशासनाची कुठलीच परवानगी न घेता अवैध बांधकाम करण्यात आल्याचा आरोप भर्रे यांनी केला असून, या अवैध बांधकामाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे.  यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर, विभागीय आयुक्त, नागपूर, अप्पर सचिव पर्यावरण व वन विभाग मंत्रालय मुंबई यांना निवेदन दिले आहे. पुढील कारवाई न केल्यास ब्रह्मपुरी नगरपरिषदच्या समोर जनआंदोलन व आमोरण उपोषण केला जाईल, असा इशाराही सभापती महेश भर्रे यांनी दिला आहे.

भुतीनाल्यामध्ये रसायनयुक्त पाणीरामदेवबाबा प्लांट हा भुतीनाला जवळ असल्याने येथील प्रदूषित तथा रासायनिक पाणी हे या भुतीनाल्यामध्ये प्रवाहित करण्यात येते. यामुळे जल प्रदूषणसुद्धा मोठ्या प्रमाणात होत असल्याचा आरोप भर्रे यांनी केला आहे. भुतीनाल्याचे पाणी हे जनावरे तसेच शेतीसाठी मोठ्या प्रमाणात वापरले जाते. मात्र तेथील पाणी प्रदूषित होत असल्याने जनावरांना पिण्यायोग्य नाही. तसेच भुतीनाल्याधील पाणीपुरवठा हा ग्रामीण भागात होत असल्याने भविष्यात येथील रासायनिक पाण्याने अनेक दुर्धर आजार होण्याची शक्यता महेश भर्रे यांनी वर्तविली आहे.

रामदेवबाबा साल्वन्ट कंपनी गेल्या दहा वर्षांपासून कार्यरत आहे. कंपनीने देशात दुसरा क्रमांक प्राप्त करून ब्रम्हपुरीचे नावलौकिक केले आहे. प्रदूषण होणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. दूषित पाणी रिसायकलिंग करून कंपनीतच वापरले जात आहे.  त्यामुळे या आरोपात कोणतेही तथ्य नाही.-नीलेश मोहता, संचालकरामदेवबाबा साल्वंट प्रा. ली.ब्रम्हपुरी(बोरगाव).

 

 

टॅग्स :pollutionप्रदूषण