शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! कोरोना उद्रेकाची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 05:01 IST

कोरोनामुळे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात प्रचंड हानी झाली आहे. विविध किरकोळ व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्यांचे रोजगार बुडाले. मात्र, कोरोनाचा कहर संपणार नाही, असेच सध्याचे चित्र आहे. जिल्ह्यात १ मे २०२० रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. त्यानंतर रूग्णांची संख्या ९६ पर्यंत पोहोचली होती. कोरोनाविरूद्ध प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिकाअधिक चाचण्या वाढविल्या.

ठळक मुद्देबुधवारी ५७, आज ६७ रुग्ण वाढले : जनतेने गर्दी टाळण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू असल्या तरी दररोज रूग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर येत आहे. बुधवारी ५७ तर गुरुवारी तब्बल ६७ रूग्ण आढळल्याने वैद्यकीय क्षेत्रात अस्वस्थता पसरली. विशेष म्हणजे, यातील बहुतांश रूग्ण संपर्कातून बाधित झाले आहेत. आतापर्यंत बाधितांची संख्या ७४९ वर पोहोचली. ही संख्या नियंत्रित राहण्याची अजिबात शक्यता नाही. त्यामुळे चंद्रपूर जिल्हा आता कोरोना उद्रेकाच्या उंबरठ्यावर आल्याची भीती नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.कोरोनामुळे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात प्रचंड हानी झाली आहे. विविध किरकोळ व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्यांचे रोजगार बुडाले. मात्र, कोरोनाचा कहर संपणार नाही, असेच सध्याचे चित्र आहे. जिल्ह्यात १ मे २०२० रोजी कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला होता. त्यानंतर रूग्णांची संख्या ९६ पर्यंत पोहोचली होती. कोरोनाविरूद्ध प्रतिबंधक उपाययोजना करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिकाअधिक चाचण्या वाढविल्या. क्वारंटाईन सेंटरची संख्या वाढविली. परजिल्हा व परराज्यातून येणाऱ्यांची तपासणी करून गृह व संस्थात्मक विलगीकरण सक्तीचे केले. आता तर अत्याधुनिक अ‍ॅन्टिजेन चाचणीही सुरू करण्यात आली. बºयाच नागरिकांची कोरोनाच्या प्रतिकारासह जगण्याची मानसिकता तयार होऊ लागली. परंतु, रूग्ण संख्या कमी होताना दिसत नाही. आतापर्यंत पुढे आलेल्या पॉझिटिव्हमध्ये संपर्कातून बाधित होणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. बुधवारी बाधितांची संख्या ७४९ वर पोहोचली. यापैकी ४२६ रूग्ण कोरोना आजारातून बरे झाले. ३२१ बाधितांवर उपचार सुरू आहेत. यातील सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे.महिनाभरात रूग्ण पुन्हा वाढणार - जिल्हाधिकारीचाचण्या वाढविण्यात आल्या. प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत गंभीर आहोत. मात्र, ऑगस्टमध्ये बाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंतच्या बाधितांच्या निरीक्षणानुसार, पॉझिटिव्हच्या घरातील लहान मुले व वृद्धांनाही बाधा झाली आहे. कुणीही लक्षणांची माहिती लपवू नये. बाहेरून आल्यानंतर चाचणी करावी. मास्क हा जीवनाचा अविभाज्य घटक मानावा. उपचाराच्या शेवटच्या टप्प्यात आल्यामुळेच दोन बाधितांचा मृत्यू झाला. माहिती लपविल्यास बिकट स्थिती उद्भवेल, असे जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.‘हाय रिस्क’ व्याधिग्रस्तांमध्ये चिंताकोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने जिल्ह्यातील नऊ लाख ४१ हजार २२० जणांची आरोग्य तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, ताप व फुफ्फुस आजारांचे रूग्ण आढळले. मधुमेहाचे नऊ हजार १९३ रूग्ण, कर्करोगाचे ३१५ रूग्ण, ताप १११८, सर्दी १४७५, श्वसनाचा त्रास ७४३, उच्च रक्तदाब २३१३५, टीबी ४८३ व हृदयरोगाचे १२१५ असे रूग्ण आढळले आहेत. वैद्यकीय तज्ज्ञांच्या माहितीनुसार कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, फुफ्फुस आजार या व्याधींनीग्रस्त रूग्ण कोरोनाच्या दृष्टीने ‘हाय रिस्क’ गटात येतात. चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर वाढत असल्याने अशा रूग्णांमध्येही आता चिंता व्यक्त होवू लागली आहे.दररोज दीड हजार चाचण्याकोरोनाचा संसर्ग रोेखण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष व जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या मार्गदर्शनात २५ अधिकाºयांची समिती रात्रंदिवस कर्तव्य बजावत आहेत. प्रत्येक अधिकाºयाकडे जबाबदारी सोपविण्यात आली. जिल्हा परिषद आरोग्य विभाग, जिल्हा शल्यचिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. कोविड १९ चा संसर्ग होवू नये, यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली. सर्व तालुक्यात संस्थात्मक विलगीकरण कक्षांचा विस्तार करण्यात आला. परजिल्हा व परप्रांतातून येणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी कक्ष सुरू केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सुसज्ज प्रयोगशाळा उभारली. या प्रयोगशाळेतून दररोज १ हजार ६०० चाचण्या केल्या जात आहेत.नियमांची एैसीतैसीसध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्वच दुकाने सुरू करण्यात आली आहे. मात्र सोशल डिस्टन्सिंग, नियमित मास्कचा वापर, रस्त्यावर न थुंकणे, खोकताना तोंडावर रुमाल ठेवणे, अशा कुठल्याही नियमांचे पालन होत नसताना दिसत आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या