शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
2
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
3
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
4
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
5
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष
6
कॉलेज तरुणीने उबर बुक केली...! अपघात झाला अन् ड्रायव्हर पळाला; आईने कंपनीला तीन प्रश्न विचारले...
7
Delhi Red Fort Blast : अल फलाह विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत आरडीएक्स तयार केले होते? ८०० पोलिस आणि एनआयए तपास करणार
8
बाजारात 'रिकव्हरी'चा वेग! महिंद्रा-अदाणी कंपनीचे शेअर्स सुस्साट! टाटा-बजाज आपटले
9
दिल्ली स्फोट: दुसऱ्या दिवशी सकाळी झाडावर लटकलेला मृतदेह सापडला; मृतांचा आकडा १० वर...
10
"मी २०३० मध्ये IAS होऊनच...", कुटुंबाचा लग्नासाठी दबाव, ९२% मिळालेल्या टॉपरने सोडलं घर
11
सुझलॉन एनर्जीचे शेअर्स ३०% घसरले! गुंतवणूकदारांनी काय करावं? ब्रोकरेज फर्मने दिलं रेटींग
12
Delhi Red Fort Blast : दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र आणि दिनेश कनेक्शन; कोण आहेत 'ही' दोन नावं?
13
"बाय बाय मुंबई, मी लवकरच...", प्राजक्ता माळी अचानक चालली तरी कुठे?, चाहते पडले चिंतेत
14
अमेरिकेतून भारतासाठी आली आनंदाची बातमी! 'या' कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
15
Delhi Blast : देशभरात हायअलर्ट! दिल्ली कार स्फोटाचा तपास NIA करणार; गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय
16
कालभैरव जयंती २०२५: कालभैरवाच्या कृपेने 'या' ८ राशींच्या आयुष्यात घडणार अविस्मरणीय घटना!
17
पहलगामनंतर आता दिल्ली..; 7 महिन्यात 41 भारतीयांचा मृत्यू, काँग्रेसचा मोदी-शाहांवर निशाणा
18
पाकिस्तानी क्रिकेटर संघासोबत असताना घरावर गोळीबार, खिडक्या फुटल्या, कुटुंबीयांमध्येही घबराट
19
Groww IPO Allotment and GMP: ग्रे मार्केटमध्ये Groww ची स्थितीही वाईट; उच्चांकापासून ८२% घसरली किंमत; कसं चेक कराल तुम्हाला शेअर्स मिळाले की नाही?
20
वाहतूककोंडीचा त्रास संपवण्यासाठी AI तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत टोल नाक्याचा प्रस्ताव

ढोल-ताशांच्या गजराविनाच बाप्पाचे आगमन, विघ्न हराया..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:28 IST

चंद्रपूरचा गणेशोत्सव विदर्भात प्रसिद्धच आहे. कोरोना महामारीने या उत्सवावर मर्यादा आल्या. ग्रामीण भागातही सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची ...

चंद्रपूरचा गणेशोत्सव विदर्भात प्रसिद्धच आहे. कोरोना महामारीने या उत्सवावर मर्यादा आल्या. ग्रामीण भागातही सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्याची परंपरा आहे. चंद्रपुरातील आझाद गार्डन परिसरात लावल्या जाणाऱ्या मूर्तीविक्री दुकानातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होते. यंदा मूर्ती खरेदीसाठी फारशी गर्दी दिसून आली नाही. महानगरपालिकेने सार्वजनिक मंडळांना ४ फूट आणि घरगुती गणपती मूर्तीसाठी २ फुटांची मर्यादा दिली. त्याचा परिणाम मूर्ती विक्रीवर झाल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. पर्यावरणपूरक उत्सवासाठी निर्माल्य कलश व कृत्रिम विसर्जन कुंड सज्ज आहेत. पीओपी मूर्ती निर्मिती, आयात, साठा व विक्री होऊ नये, यासाठी मनपा पथकाची करडी नजर होती.

बॉक्स

ढोल-ताशांचा गजर गायब

वाजत-गाजत बाप्पाला घरी नेण्याऐवजी अगदी साध्या पद्धतीचा भाविकांनी स्वीकार केला. अनेक व्यावसायिकांनी अगदी वेळेवर मागणी नोंदवली. परिणामी, चौरंग किंवा पाट, मखर, पूजास्थानाच्या वर बांधण्याकरिता नारळ, तांब्या, पळी, पंचपात्री, ताम्हण, समई, अक्षता, वस्त्र, जानवे, अष्टगंध, पत्री, प्रसादाकरिता मोदक, मिठाई, पेढे, गोड पदार्थांचे दर वाढले. भाविकांना चढ्या दराने विकत घ्यावे लागले.

बॉक्स

पावसामुळे छोट्या विक्रेत्यांचे नुकसान

चंद्रपुरातील गांधी चौक व गोल बाजारातील रस्त्यावर सजावटीची फुले, केवड्याची पाने, कमळ, दूर्वा, तुळशी, पत्रावळी विकणारे लहान विक्रेते बसतात. शुक्रवारी सायंकाळी अचानक पाऊस आल्याने त्यांची त्रेधातिरपीट उडाली. बाजारात चिखल झाल्याने ग्राहकांनाही मनस्ताप झाला.

बॉक्स

इको फ्रेंडली स्पर्धेला सुरुवात

श्री गणरायाचा उत्सव हा गर्दी टाळून करावा. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी मनपाने माझी वसुंधरा अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणस्नेही बाप्पा स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धेची सुरुवात आजपासूनच झाली. अंतिम तारीख १६ सप्टेंबर असून, मूल्यमापन १७ सप्टेंबर रोजी होणार आहे.

दोन हजार पोलीस तैनात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवादरम्यान गर्दी होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने जिल्हाभरात दोन हजार पोलीस तैनात केले. गृहरक्षक दलाच्या जवानांचीही नियुक्ती करण्यात आली. तालुकानिहाय जबाबदारी सोपवून कायदा व सुव्यवस्थेकडे लक्ष देण्याच्या सूचना पोलीस अधीक्षकांनी केल्या.

कोट

गणेशोत्सव पूजनाची प्राचीन परंपरा आहे. या उत्सवातून सुखाची व मांगल्याची अपेक्षा करतो. हा उत्सव साजरा करताना नागरिकांनी कोरोना निर्बंधांचे कुठेही उल्लंघन होऊ नये, याची दक्षता घ्यावी. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करावा. स्वत:चे व कुटुंबाचे आरोग्य जपावे.

-अजय गुल्हाने, जिल्हाधिकारी, चंद्रपूर

कोट

यंदाही कोरोना सावटातच गणेशोत्सव साजरा होत आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे. विनाकारण गर्दी करू नये. कायदा व सुव्यवस्थेला कुठेही धक्का लावू नये. कोविड प्रतिबंधासाठी लागू केलेल्या सर्व नियमांची खबरदारी घ्यावी.

-अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक, चंद्रपूर