शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
Today's Horoscope: आर्थिक लाभ होण्याचा योग; तुमची राशी काय सांगतेय?
3
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
4
बेपर्वाईने गाडी चालवणे आत्ताच थांबवा, मृत्यू झाल्यास नातेवाईकांना इन्शुरन्सचा एकही रुपया मिळणार नाही!
5
स्विमिंगपूलमध्ये पोहून घरी परतताना भीषण अपघात, चार मुलांसह पाच जण ठार!
6
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
7
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
8
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
9
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
10
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
11
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
12
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
13
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
14
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
15
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
16
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
17
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
18
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
19
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
20
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!

बल्लारपूर उत्तम नागरी सुविधांचे शहर बनविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 22:37 IST

बल्लारपूर शहरात मागील चार वर्षांत कोट्यवधींची विकासकामे सुरू आहेत. येत्या काही दिवसांत उत्तम नागरी सुविधांचे महाराष्ट्रातील एकमेव शहर म्हणून पुढे येईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नगरपरिषदमध्ये मंगळवारी पार पडलेल्या रुग्णवाहिका, शववाहिका व घंटागाडी लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

ठळक मुद्देसुधीर मुनगंटीवार : रुग्णवाहिका, शववाहिका व घंटागाडीचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : बल्लारपूर शहरात मागील चार वर्षांत कोट्यवधींची विकासकामे सुरू आहेत. येत्या काही दिवसांत उत्तम नागरी सुविधांचे महाराष्ट्रातील एकमेव शहर म्हणून पुढे येईल, असे प्रतिपादन राज्याचे वित्त, नियोजन व वने तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. नगरपरिषदमध्ये मंगळवारी पार पडलेल्या रुग्णवाहिका, शववाहिका व घंटागाडी लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.यावेळी वनविकास महामंडळ अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आमदार अ‍ॅड. संजय धोटे, नगराध्यक्ष हरिश शर्मा, मीना चौधरी, उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, मुख्याधिकारी विपीन मुदधा उपस्थित होते. पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आमदार विकास निधीतून अतिदक्षता रुग्णवाहिका व शववाहिका आणि वेकोलि सामाजिक दायित्व निधीतून नगरपरिषद परिसरात उभ्या राहणाऱ्या एलईडी स्क्रिनचेदेखील लोकार्पण केले. स्वच्छ भारत अभियानअंतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प अहवालातील तरतुदीनुसार घरोघरी कचरा संकलनाकरिता ६४ लक्ष रुपयांच्या १४ टिप्परचे लोकार्पण करण्यात आले. वैशिष्ट्यपूर्ण निधीतून नगर परिषद इमारतीवर सौर ऊर्जाप्रकल्प राबविण्यासाठी ११ लक्ष ५५ हजार रुपयांचा सूक्ष्म ऊर्जानिर्मिती प्रकल्प लोकार्पित करण्यात आला. या प्रकल्पातून दररोज ४० ते ८० युनिट वीज निर्मिती होणार आहे. यामुळे दरमहा २० हजार रुपयांची बचत होणार आहे. पाच वर्षांत या प्रकल्पावरील खर्च वसूल होणार आहे. स्वच्छ सर्व्हेक्षण मोहिमेतील सहभागासाठी नागरिकांचे अभिनंदनही केले. स्वच्छ वॉर्ड स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला. याशिवाय नगर परिषद कर्मचारी आरोग्य विमा स्मार्टकॉर्ड प्राथमिक स्वरुपात वितरीत करण्यात आले. याचा लाभ १७३ कर्मचाºयांना होणार आहे. बल्लारपूर शहरासह बल्लारपूर तालुकादेखील नागरी सुविधांसाठी ओळखला जाईल, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले. वर्षभरात तालुक्यातील सर्व गावांमध्ये गॅस सिलिंडरचा वापर महिला करतील. हा तालुका महाराष्ट्रातील पहिला धूरमुक्त तालुका करण्याचा संकल्पही ना. मुनगंटीवार यांनी जाहीर केला.मुलींची पहिली डिजिटल शाळाबल्लारपूर नगर परिषदअंतर्गत राज्यातील पहिली मुलींची डिजिटल शाळा आकाराला येत आहे. महाराष्ट्रातील देखणे बसस्थानकही बल्लारपुरात उभे होत असून रेल्वे स्थानकाप्रमाणे या शहराचे नाव देशभर पोहोचेल, असा आशावाद पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. मागील चार वर्षात राबविण्यात आलेल्या अनेक प्रकल्पांचाही त्यांनी यावेळी उल्लेख केला.