बल्लारपूर : लोकमत सखी मंच बल्लारपूर व संस्कृती दुर्गोत्सव मंडळाच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक जयभीम चौकात दांडिया स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत अनेक चमूंनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. या स्पर्धेत जय अंबे ग्रुपने प्रथम क्रमांक, के.डी.ग्रुपने द्वितिय क्रमांक तर मॉ.वैष्णवी ग्रुपने तृतिय क्रमांक पटकाविला. या तिनही चमूंना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेला अश्विनी देवाळकर, दिपाली फुलझेले, कोमल संगमवार, दीपक शिवा, पूजा बल्लारी, निशा बावणे, आशिष मुकेवार, मंगश, शुभम, बापूभैय्या रंजन यांच्यासह संस्कृती दुर्गोत्सव मंडळातील कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. स्पर्धेचे परीक्षण आशिष मुकेवार, सागर धाबर्डे यांनी केले. या स्पर्धेत शहरातील विविध चमूंनी सहभाग नोंदविला होता. स्पर्धा पाहण्यासाठी शहरातील नागरिकांनी एकच गर्दी केली होती. (तालुका प्रतिनिधी)
बल्लारपूर सखी मंचतर्फे दांडिया स्पर्धा उत्साहात
By admin | Updated: October 27, 2015 01:13 IST