शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
2
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
3
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
4
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
5
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
6
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
7
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
8
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
9
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
10
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
11
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
12
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
13
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
14
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
15
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
16
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
17
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
18
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
19
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
20
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?

बल्लारपूर न.प. स्वच्छता कर्मचाऱ्यांचा ज्युनिअर अमिताभच्या हस्ते सत्कार

By admin | Updated: January 16, 2017 00:46 IST

स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत येथील क्रिसेंट शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने बल्लारपूर नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ज्यूनिअर अमिताभ बच्चन यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.

बल्लारपूर : स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत येथील क्रिसेंट शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने बल्लारपूर नगर परिषदेच्या सफाई कर्मचाऱ्यांचा ज्यूनिअर अमिताभ बच्चन यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. स्थानीय न.प. बचत भवनात झालेल्या या कार्यक्रमात मुख्याधिकारी विपीन मुदधा, पर्यावरण मित्र सचिन वाझलवार, नगरसेवक येलय्या दासरप, मंडळाचे अध्यक्ष डॉ. झेड.जे. खान यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नगर परिषदेचे सेवानिवृत्त स्वास्थ्य निरीक्षक शेख रहमान यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी मुदधा म्हणाले, स्वच्छतेबाबत सर्वांनीच जागरूकता बाळगल्यास शहर स्वच्छ व सुंदर राहण्यास मदत होईल. तर मंडळाचे सचिव अ‍ॅड. नाजीम खान म्हणाले, बिग बी अमिताभ बच्चन हे स्वच्छता अभियानाचे दूत आहेत. मंडळाने त्याच अनुषंगाने त्यांच्याच चेहरा पट्टीचा ज्यूनि. अमिताभ बच्चन (फिरोज कान) यांना येथे आमंत्रित केले. यावेळी दासरप, शेख रहमान, वाझलवार यांचीही भाषणे झालीत. डॉ. झेड जे. खान यांनी मंडळाच्या उपक्रमाची माहिती देत स्वच्छतेचे महत्व सांगितले. संचालन अंश रंथे यांनी तर आभार प्रदर्शन रियाज खान यांनी केले.त्यानंतर क्रिसेंट शिक्षण प्रसारक मंडळाच्या क्रिएटीव माईन्ड स्कुलचे वार्षिकोत्सवाचे उद्घाटन ज्यू. अमिताभ यांचे प्रमुख उपस्थितीत बालाजी सभागृहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी विपीन मुदधा, पो. निरीक्षक प्रदीप शिरस्कर उपस्थित होते. संस्थाध्यक्ष डॉ. झेड. जे. खान यांनी प्रास्ताविक भाषणातून विद्यार्थ्यांमधील गुणांवर प्रकाश टाकला. यावेळी ज्यूनि. अमिताभ, शिरस्कर, मुदधा, वाझलवार यांची भाषणे झाली. विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले. संचालन अंश तर आभार प्रदर्शन उज्वला खोब्रागडे यांनी केले. मुख्याध्यापिका अरविंदर अरोरा, प्रसन्ना लिंगाला व शिक्षिकांनी परिश्रम घेतले. (तालुका प्रतिनिधी)माकडाच्या हल्ल्यात दोघे जखमी मूल : येथील सुभाष नगर वार्डामध्ये एका मोठ्या माकडाने दोन दिवसांपासून लोकांवर हल्ले केले. त्यामध्ये दोघेजण जखमी झाले. याची माहिती वन क्षेत्र सहायक बालपाडे यांना देण्यात आली. त्यांनी सर्पमित्र उमेशसिंह झिरे यांच्यासह पाहणी केली. व माकडला पकडण्यात आले. (शहर प्रतिनिधी)