शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

सेवादासनगरवासी बैलबंडीने आणतात तेलंगणातून पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2019 00:44 IST

नोकेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत सेवादासनगर येथील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत असल्याने जवळच असलेल्या तेलंगणा राज्यातील कोलामा गावातून बैलबंडीने पाणी आणावे लागत आहे.

ठळक मुद्देगावकरी हैराण : पाण्यासाठी रात्रभर जागरण

लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : नोकेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत सेवादासनगर येथील नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत असल्याने जवळच असलेल्या तेलंगणा राज्यातील कोलामा गावातून बैलबंडीने पाणी आणावे लागत आहे. पाण्यासाठी रात्रभर जागावे लागत असून शेतकरी दिवसभर मशागतीची कामे सोडून पाण्यासाठीच भटकंती करावी लागत असल्याचे दिसून येत आहे.सातशेहून अधिक लोकसंख्या असलेल्या सेवादासनगरात दरवर्षीच पाण्याची भीषण टंचाई असते. फेब्रुवारी महिन्यापासुनच पाण्यासाठी भटकंती करावी लागते. शेतीच्या मशागतीचे कामे करणाऱ्या शेतकऱ्यांना बैलबंडीतून पाणी आणणे सुरू केले. जिल्हा परिषद सदस्य कमल राठोड या सेवादासनगरातील रहिवाशी आहेत. लगतच्या गावातच पंचायत समितीचे सभापती आणि उपसभापती राहतात. पण, तालुक्याचे तर सोडाच पण शेजारच्या गावात जाऊन पाणी टंचाईची स्थिती काय आहे, हे जाणून घेण्यास वेळ नसल्याची टीका गावकरी करीत आहेत. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळेच पाणी टंचाईची समस्या दूर झाली नाही.पाटण ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या जनकापुरातही हीच स्थिती आहे. शिवाय, परिसरातील अनेक गावांमध्ये पिण्याचे पाणी मिळत नाही. महिला हैराण झाल्या आहेत. पं. स. सदस्य अंजना पवार यांनी सेवादासनगरातील जलसंकटाविषयी अधिकाऱ्यांना पत्र दिले. परंतु समस्या जैसे थे असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. येत्या सात दिवसांत गावातील पाणी समस्या सोडविली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई