शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिकारीवरून बजरंग आणि छोटा मटका भिडले, एकाचा मृत्यू, दुसरा गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2023 07:02 IST

ताडोबालगतच्या वाहानगाव शिवारातील घटना

चिमूर (चंद्रपूर) : वाघांची झुंज ऐकली आहे. मात्र ती ग्रामस्थांनी प्रत्यक्ष बघितली. दोन वाघांमध्ये शिकारीवरून झालेल्या या झुंजीत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरा गंभीररीत्या जखमी झाला. जखमी वाघ जवळच एका झुडपात बराचवेळ बसून होता. त्याचीही प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शीनी 'लोकमत'ला दिली. ही थरारक झुंजीची घटना मंगळवारी दुपारी २ च्या सुमारास चिमूर तालुक्यातील वाहानगावचे शेतकरी सुभाष दोडके यांच्या शेतात घडली. शुक्रवार, १० नोव्हेंबरला छोटा मटका नावाच्या वाघाने एका बैलाची शिकार केली होती. या शिकारीवरून या दोन्ही वाघांमध्ये टोकाची झुंज झाली असावी, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. 

ग्रामस्थांच्या डोळ्यांदेखत झुंजीचा थरार

वाहानगाव येथील काही ग्रामस्थ दुपारी शेतात गेले असता त्यांना दोन वाघांमध्ये जोरदार झुंज होत असल्याचे बघायला मिळाले. त्यांनी लगेच गावाच्या दिशेने धाव घेत हा प्रकार गावकऱ्यांना सांगितला. त्यानंतर ग्रामस्थ झुंज बघण्यासाठी शिवारात पोहचले. मात्र झुंज संपलेली होती. यामध्ये एक वाघ जागीच गतप्राण झालेला होता. तर दुसरा वाघ जखमी अवस्थेत शेतालगतच्या जंगलातील झुडपात बसून होता. वाघांना बघण्यासाठी गावकयांनी मोठी गर्दी केली होती. काहींनी मृत वाघासोबत सेल्फीही काढला. छोटा मटका बजरंगवर भारी ठरल्याची चर्चाही यावेळी रंगल्या.

टॅग्स :Tadoba Andhari Tiger Projectताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पTigerवाघ