शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

फवारणीच्या विषबाधेवर नियंत्रणासाठी जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2019 00:46 IST

कीटकनाशक फवारणीतून विषबाधा टाळण्यासाठी कृषी तसेच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या दृष्टीने आरोग्य विभागाला विशेष सूचना देण्यात येत असून मागील दोन वर्षात झालेली पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांनी घ्यावी काळजी : मागील वर्र्षाची पुनरावृत्ती टाळण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कीटकनाशक फवारणीतून विषबाधा टाळण्यासाठी कृषी तसेच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. या दृष्टीने आरोग्य विभागाला विशेष सूचना देण्यात येत असून मागील दोन वर्षात झालेली पुनरावृत्ती टाळण्यासाठी खबरदारी घेण्यात येणार आहे.कीटकनाशक फवारणीतून विषबाधा झाल्याने मागील दोन वर्षांमध्ये अनेक शेतमजुरांना आपला जीव गमवावा लागला होता. विदर्भात हा आकडा ४३ वर पोहोचला होता. एक हजार ८०० शेतकरी, शेतमजूर बाधित झाले होते. हा प्रकार दिल्लीपर्यंत पोहोचला. संपूर्ण प्रशासन हादरले. यावर अनेक उपाय करण्यात आले. २०१८ मध्येही उपायांची मालिका सुरूच ठेवण्यात आली. त्यामुळे विषबाधा बळीचे प्रमाण कमी झाले. आता चालू हंगामात कीटकनाशक फवारणीमुळे शेतकरी, शेतमजूरांना बाधा होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी. प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, तूर या पिकांवर कीटकनाशक फवारणी करणाºया शेतमजुरांची नि:शुल्क आरोग्य तपासणी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयामार्फत विशेष अभियान राबविले जाणार आहे असून जनजागृती केली जाणार आहे.ब्रह्मपुरी तालुक्यात फवारणी प्रशिक्षण तसेच जनजागृतीब्रह्मपुरी तालुक्यात एकूण २६ हजार हेक्टर क्षेत्रापैकी २४ हजार हेक्टर क्षेत्र हे धान पिकाखाली आहे. तालुक्यातील गांगलवाडी, बरडकिन्ही, गोगाव व आवाळगाव येथील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड केली आहे. यावर्षी पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे धान तसेच इतर पिकांच्या लागवडीस उशीर झाला आहे. सतत ढगाळ वातावरण असल्यामुळे पिकांवर किड व रोगाचा प्रार्दुभाव होण्याची शक्यता आहे. किड व रोगांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी विविध प्रकारच्या रासायनिक किटकनाशक व बुरशीनाशकाची फवारणी करतात. किटकनाशके फवारणी करताना विषबाधा होऊ नये तसेच विविध पिकांवरील कीड व रोग तसेच कपाशी पिकावर गुलाबी बोंड अळीचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी ग्रामपंचायत मेंडकी येथे २८ आॅगस्टला सकाळी कीटकनाशके फवारणी करताना घ्यावयाची दक्षता तसेच विविध पिकांवरील कीड व रोग नियंत्रणाबाबत शेतकºयांमध्ये कृषी विभाग पंचायत समिती ब्रह्मपुरी जनजागृती करणार आहे. कीटकनाशक फवारणी करताना विषबाधा टाळण्यासाठी घ्यायची दक्षता तसेच कृषी विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांसदर्भात माहिती देण्यात येणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी