शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आमदार चषक कबड्डी सामन्यादरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळली; अनेकजण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2021 11:43 IST

वरोरा येथे विदर्भ स्तरीय सुरू असलेल्या आमदार चषक कबड्डी सामना रंगला असताना अचानक प्रेक्षकांची गॅलरी कोसळली. यात अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे.

ठळक मुद्देवराेरा येथील घटना : जखमी उपचारासाठी दाखल

चंद्रपूर : आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे थाटात उद्घाटन झाले. त्यानंतर सामन्याला सुरुवात हाेताच प्रेक्षक गॅलरी काेसळली. त्यात अनेक प्रेक्षक जखमी झाले. ही घटना वराेरा (जि. चंद्रपूर) शहरातील काॅटन मार्केट मैदानावर शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. जखमींना लगेच खासगी तसेच उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले.

वरोराच्या आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यावतीने अखिल भारतीय कबड्डी स्पर्धा आमदार चषकाचे आयोजन शनिवारपासून करण्यात आले. या दोन दिवसीय कबड्डी स्पर्धेचे शनिवारी उद्घाटन झाले. त्यानंतर पहिल्या दिवशी सायंकाळच्या सत्रात सामन्याला सुरुवात झाली. रात्री १० वाजताच्या सुमारास अनपेक्षितपणे प्रेक्षक गॅलरी कोसळली. त्यात अनेक प्रेक्षक जखमी झाले. जखमींवर खासगी व उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच खा. बाळू धानोरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर त्यांनी जखमींना भरती केलेल्या खासगी रुग्णालयात भेट देऊन चौकशी केली, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात भेट देणार असल्याचे ते म्हणाले. सामने संपल्यानंतर गाणे सुरू असताना ही घटना घडली असल्याचे सांगत कोणीही गंभीर जखमी नसल्याचे त्यांनी सांगितले. नेमके किती जण जखमी झाले, हे कळू शकले नाही. यापूर्वीही अशीच घटना वरोरा येथे घडली होती, हे विशेष.

टॅग्स :AccidentअपघातKabaddiकबड्डी