शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
2
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
3
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
4
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
5
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
6
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
7
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
8
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
9
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
10
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
11
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
12
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
13
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
14
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
15
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
16
गायत्री पन्हाळकरला मराठीत शंभर गुण; राज्यात प्रथम : वाणिज्य शाखेत ८७ टक्के गुण
17
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
18
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
19
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
20
२१०० रुपये लाडक्या बहिणींना देणे अशक्य! संजय शिरसाट निधी कापला म्हणून अजित पवारांवर संतापले

मोर्चाद्वारे वेधले चंद्रपूरच्या प्रदूषणाकडे लक्ष

By admin | Updated: December 16, 2015 01:25 IST

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना विविध गंभीर आजार उद्भवत आहेत.

प्रदूषण दिले, वीज सवलत द्या : नागपूर विधानभवनासमोर आंदोलनचंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रदूषण वाढल्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना विविध गंभीर आजार उद्भवत आहेत. जिल्ह्यामध्ये धुळीचे प्रदूषण व ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात असल्याचा अहवाल निरी यासारख्या संस्थेने दिलेला आहे. यावर शासनाने उपाययोजना करून जिल्ह्यातील नागरिकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून द्यावे, या मागणीसाठी नागपूर विधानभवनासमोर १४ डिसेंबरला सामाजिक कार्यकर्ते राजेश बेले यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन करण्यात आले.चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सीटीपीएस, इतर पॉवर प्लाँट व २८ कोळसा खाणी, सिमेंट प्लाँट यामुळे नागरिकांना विविध आजाराचा सामना करावा लागत आहे. याची नोंद जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये आहे. हृदयविकार, अ‍ॅसीडीटी, टी.बी., स्किन विकार या आजाराने गत पाच वर्षामध्ये ४२० नागरिकांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या यादीत दर्शविलेली आहे. म्हणून जिल्ह्याला सरकारने प्रदूषण तर दिले, सवलत काय देणार, हा जनतेचा प्रश्न आहे. त्यामुळे चंद्रपुरातील नागरिकांना विद्युत बिलामध्ये ५० टक्के सबसिडी द्यावी, सुपर मल्टी स्पेशालिटी सामान्य रुग्णालय द्यावे, जिल्ह्यातील नागरिकांकडून गेल्या अनेक वर्षांपासून मनपा वृक्ष कर गोळा करते. या वृक्ष कराच्या रक्कमेची चौकशी करून दोषीवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी. जिल्ह्यातील जुन्या पाईपलाईन कालबाह्य झाल्या आहेत. यामुळे पाण्याची गळती व समस्या निर्माण झाली आहे. पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. यामुळे चंद्रपूर शहरात नविन पाईप लाईन टाकावी. शहर महानगरपाालिकेने केलेली गृहकर वाढ मागे घ्यावी आदी मागण्यांकडे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात राजेश बेले, नितीन गाडगे, सुमीत ढोकपांडे, चेतन ढोक, अभी वाडरे, शुभम पोटदुखे, राज पोटदुखे, फिरोज शेख, सुजीत वळस्कर, रोशन गिरडकर, राजेंद्र टिपले, जितेश झाडे, संकेत खराडे, प्रज्योत चिलके आदींचा सहभाग होता. (स्थानिक प्रतिनिधी)