शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

चाकूने प्रेयसीचा गळा चिरून केला आत्महत्येचा प्रयत्न; माणिकगड किल्ल्यावरील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2022 20:30 IST

Chandrapur News लग्नास नकार दिल्याने प्रियकराने चाकूने प्रेयसीचा गळा चिरला. यानंतर त्याने स्वत:च्या हाताच्या मनगटावर चाकूने घाव घातला. सोमवारी दुुपारी १ वाजेच्या सुमारास ऐतिहासिक माणिकगड किल्ल्यावर घडलेली घटना मंगळवारी पुढे आली.

ठळक मुद्दे प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल

चंद्रपूर : लग्नास नकार दिल्याने प्रियकराने चाकूने प्रेयसीचा गळा चिरला. यानंतर ती रक्तबंबाळ होताच त्याने स्वत:च्या हाताच्या मनगटावर चाकूने घाव घातला. सोमवारी दुुपारी १ वाजेच्या सुमारास ऐतिहासिक माणिकगड किल्ल्यावर घडलेली घटना मंगळवारी पुढे आली. या प्रकरणी जिवती पोलीस ठाण्याने प्रियकर अजय कांबळे (२१, रा. गडचांदूर) यांच्याविरुद्ध भादंविच्या कलम ३०७ अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. या घटनेने गडचांदूर शहरात एकच खळबळ उडाली आहे.

अजय कांबळे हा आपल्या प्रेयसीला सोबत घेऊन माणिकगड किल्ल्यावर सोमवारी दुपारी गेला. दरम्यान, अजयने प्रेयसीकडे लग्नाची मागणी घातली. परंतु प्रेयसीने लग्न करण्यास स्पष्ट नकार दिल्याने अजय संतापला. त्याने रागाच्या भरात सोबत आणलेल्या चाकूने प्रेयसीच्या गळ्यावर घाव घातला. यामध्ये गळा १० सें.मी. चिरला असल्याचे वैद्यकीय सूत्राने सांगितले. नंतर त्याने स्वतःच्या हातावर, मनगटावर चाकूने घाव घालून आत्महत्येचा प्रयत्न केला. बराच वेळ दोघेही तिथेच होते. किल्ल्यावर फिरायला गेलेल्या काही पर्यटकांना हे दोघेही रक्तबंबाळ अवस्थेत दिसून आले. त्यांनी लगेच एका मजुराला बोलावून त्याच्या साहाय्याने किल्ल्यावरून दोघांनाही खाली आणले.

 

 पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना जिवती प्राथमिक केंद्रात नेले. तेथून प्राथमिक उपचार करून गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात हलविले. प्रकृती गंभीर असल्याने दोघांनाही चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या दोघांच्याही प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे वैद्यकीय सूत्राचे म्हणणे आहे. पुढील तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक जगताप करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी