शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपुरात अस्वलाचे आगमन; नागरिकांची तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 12:02 IST

जंगलातून भरकटलेले एक अस्वल गुरुवारी पहाटेच्या सुमारास बल्लारपुरातील भरवस्तीत शिरले.

ठळक मुद्देबेशुध्द करून केले जेरबंद

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : जंगलातून भरकटलेले एक अस्वल गुरुवारी पहाटेच्या सुमारास बल्लारपुरातील भरवस्तीत शिरले. वस्तीत अचानक अस्वल पाहून नागरिकांची एकच तारांबळ उडाली. याची माहिती वनविभागाला देण्यात आली. बऱ्याच प्रयत्नानंतर वनकर्मचाऱ्यांनी अस्वलीला बेशुध्द करून जेरबंद केले.पहाटे ४ वाजताच्या सुमारास सकाळी फिरायला जाणाऱ्या लोकांना हे अस्वल, वस्ती विभागात गांधी पुतळा परिसरात दिसले. त्यामुळे प्रारंभी नागरिकांची एकच तारांबळ उडाली. त्यानंतर बघ्यांची गर्दी झाली. गर्दी बघून अस्वल घाबरले आणि मार्ग मिळेल त्या दिशेने ते पळत सुटले. या दरम्यान ही माहिती वनविभागाला देण्यात आली. त्यांनी तिला पकडण्याचा बराच प्रयत्न केला. ती हातात न लागता पळत येथील वनकार्यालयाकडे गेली व तेथील कॉलनीतील पडक्या शौचालयात जावून बसली. वनकर्मचाऱ्यांनी तिला गुंगीचे इंजेक्शन देऊन जेरबंद केले. आजपर्यंत जंगली प्राण्यांचा शिरकाव शहराच्या वेशीपर्यंतच झाडी झुडपांच्या विरळ वस्ती असलेल्या भागातच व्हायचा. आता तर ते चक्क भरवस्तीत वर्दळीच्या ठिकाणी दिसू लागले आहे. या प्रकाराने नागरिकांना भीती व चिंता वाटू लागली आहे. सदर अस्वल बरेच मोठे होते. ती नांदगाव - विसापूरकडून रेल्वे गोलपुलाकडून शहरात झाला असावा, असे बोलले जात आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीव