बल्लारपूर : वसंत ऋतूचे चटके सर्वत्र जाणवू लागले आहे. वनातही गरम वारे वाहू लागले आहे. जंगलात राहणाऱ्या वन्यप्राण्यांना पाण्याची कमतरता भासू नये, यासाठी बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील वनतळे व पाणवठ्याची पाहणी सतत सुरू असून, आता ‘सेव्ह फॉरेस्ट सेव्ह’ चंद्रपूर या बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दोन वनपरिक्षेत्रातील कक्ष क्र. ४९९ मध्ये बोअरवेलचे खोदकाम करून आगाऊ पाण्याची व्यवस्था करून देण्यात आली आहे.
बल्लारशाह वनपरिक्षेत्रातील मानोरा, कारवा, बल्लारशाह, कळमना, उमरी या उपक्षेत्रात बोअरवेलची व्यवस्था आहे. कृत्रिम तलावही आहे व वनतळेही आहेत. यामुळे वन्यप्राण्यांना पाण्याची कमतरता भासत नाही. तरीही सेव्ह फॉरेस्ट सेव्ह या संस्थेने प्रेरणादायी सहकार्य केले आहे. कारवा उपक्षेत्रात बोअरवेलचे खोदकाम करताना बल्लारशाह वनपरिक्षेत्र अधीकारी संतोष थिपे, क्षेत्र सहायक प्रवीण बिपटे, रुंदन कातकर, प्रवीण विरुटकर, एस. विनय व्यंकटेश्वरराव, उज्ज्वल नथानी, ॲड. रणंजय सिंग, राकेशसिंग शेवरेण यांची उपस्थिती होती.
कोट
वन क्षेत्रात काम करताना उन्हाळ्याच्या दिवसात वनकामगार व क्षेत्र सहायक धगधगत्या उन्हाची व हिंसक वन्यप्राण्यांची पर्वा न करता जीवावर उदार होऊन कर्तव्य पार पाडतात. यात लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, तरच वनाची सुरक्षा होऊ शकते.
- संतोष थिपे, वनपरिक्षेत्र अधिकारी, बल्लारशाह.