शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

धुमाकूळ घालणाऱ्या वाघाचा बंदोबस्त करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2019 12:36 AM

मागील एका वर्षापासून तालुक्यातील चिचगाव, वांद्रा, डोर्ली, आवळगाव, हळदा, मुडझा, बल्लारपूर, एकारा, भूज व नवेगाव परिसरात पट्टेदार वाघासह बिबट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. पाळीव जनावरे व नागरिकांवर हल्ले होत असल्याने दहशत पसरली.

ठळक मुद्देगावकऱ्यांची मागणी : वन विभागाच्या चर्चासत्रात उमटली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्कब्रह्मपुरी : मागील एका वर्षापासून तालुक्यातील चिचगाव, वांद्रा, डोर्ली, आवळगाव, हळदा, मुडझा, बल्लारपूर, एकारा, भूज व नवेगाव परिसरात पट्टेदार वाघासह बिबट्यांचा धुमाकूळ वाढला आहे. पाळीव जनावरे व नागरिकांवर हल्ले होत असल्याने दहशत पसरली. त्यामुळे वाघासह हिंस्त्र वन्यप्राण्यांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी गावकऱ्यांनी वन विभागाने गांगलवाडी येथे घेतलेल्या चर्चासत्रात केली.यावेळी चंद्रपूरचे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामाराव, ब्रम्हपुरी उप वनसंरक्षक कुलराज सिंह, ठाणेदार मकेश्वर, माजी आमदार प्रा. अतुल देशकर, मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबेळकर, पं.स सदस्य रामलाल दोनाडकर, पं. स सदस्य सुनीता ठवकर, पं. स. सदस्य निलकंठ मानापुरे, गांगलवाडीचे सरपंच ज्ञानेश्वर भोयर व तालुक्यातील ३८ गावांचे प्रतिनिधी उपस्थित होते.वन्य प्राण्यांमुळे पिकांचे नुकसान व पाळीव जनावरे तसेच नागरिकांवर होणारे हल्ले टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करत आहे, याची माहिती वनाधिकाऱ्यांनी दिली. परंतु, नागरिकांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी विविध उपाययोजना सुचविल्या. विविध योजनांच्या अंमलबजावणीतील त्रुटी सांगितल्या. वन विभाग व पोलीस विभागाने गावकऱ्यांच्या समस्या जाणून निर्णय घेण्याची भूमिका उपस्थितांनी मांडली. मानद वन्यजीव रक्षक करंबेळकर, पं. स सदस्य दोनाडकर, पं. स. सदस्य ठवकर, पं. स. सदस्य मानापुरे, सरपंच भोयर यांनीही समस्येवर उपाययोजना सुचिवल्या. यावेळी वन विभागाचे कर्मचारी, वन कामगार, सरपंच, पोलीस पाटील, महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्ष, गाव वन समितीचे सदस्य उपस्थित होते.

टॅग्स :Tigerवाघforest departmentवनविभाग