शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

मानधन वाढीसाठी पालकमंत्र्यांच्या निवासस्थानावर आक्रोश मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2016 01:01 IST

मानधन वाढीसाठी शालेय पोषण कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानावर आक्रोश मोर्चा ...

विविध मागण्या : सुधीर मुनगंटीवारांशी केली शिष्टमंडळाने चर्चा चंद्रपूर : मानधन वाढीसाठी शालेय पोषण कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या निवासस्थानावर आक्रोश मोर्चा काढूून ना.मुनगंटीवार यांना निवेदन दिले.राष्ट्रीय शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शापोआ कर्मचारी गेल्या १० ते १२ वर्षापासून ग्रामीण व नगर परिषदांच्या शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजविण्याच्या कामासोबतच शाळा उघडणे, शाळेची देखरेख करणे, स्वच्छता करणे हे काम निमूटपणे व प्रामाणिकपणे करीत आहेत. परंतु सरकार त्यांना दर महिन्याला फक्त १००० रुपये मानधन देऊन त्यांना वेठबिगाराची वागणूक देत आहे. एकीकडे प्रचंड महागाई वाढत आहे. परंतु सरकार शापोआ कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. या दरम्यान दोनदा आहाराच्या खर्चाचे पैसे वाढले. परंतु स्वयंपाकी महिलांचे मानधन वाढले नाही. तसेच पोषण आहार कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधनही नियमित मिळत नाही. मागील वर्षी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करून प्रतिमाह ७५०० रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु दिलेल्या आश्वासनाची पुर्तता केली नसल्यामुळे नुकताच ११ डिसेंबरला नागपूर विधानसभेवर विशाल मोर्चा काढून प्रलंबित मागण्याविषयी आपले सरकारचे लक्ष वेधण्यात आले. तेव्हा विनोद तावडे यांनी मानधनात वाढ करण्यासाठी जानेवारी महिन्यात मंत्रालयात संघटनेसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु या आश्वासनाची सुद्धा पुर्तता झालेली नाही. म्हणून विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार युनियन (आयटक) राज्य कौन्सीलच्या वतीने महाराष्ट्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर येथील निवासस्थानावर आझाद बगीचा चंद्रपूर येथून दुपारी १२.३० वाजता राज्यव्यापी आक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्या सुचनेवरून सदर मोर्चा चर्चा करण्यासाठी वरोरा मार्गावरील विश्रामगृहाकडे वळते करण्यात आला.सदर मोर्चात विदर्भ संघटक विनोद झोडगे, भाकपाचे राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. महेश कोपुलवार यवतमाळचे जिल्हा अध्यक्ष दिवाकर नागपुरे, चंद्रपूरचे जिल्हाध्यक्ष संतोष दास, गडचिरोलीचे जिल्हाध्यक्ष देवराव चवळे, आयटकच्या राज्य कार्यकारिणी सदस्य वनिता कुंटावार, अकोलाचे जिल्हा सचिव तारासिंग राठोड, बुलढाणाचे सचिव सुनिल कराडे, राज्य कार्यकारिणी सदस्य राजू गैनेवार , अजय रेड्डी यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ मुनगंटीवार यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये मानधन वाढीसाठी तरतुद करण्याचे त्यांनी कबुल करून यासंदर्भात मंत्रालयात शिक्षण विभागाची बैठक लावण्याचे आश्वासन देऊन तसे पत्र संघटनेला देण्याचे कबुल केले. सोबतच बऱ्याच प्रलंबित मागण्याविषयी चर्चा करण्यात आली. यामध्ये शालेय पोषण कर्मचाऱ्यांना चतुर्थ श्रेणीचा दर्जा देऊन किमान १५ हजाप रुपये वेतन देण्यात यावे. शासन निर्णय १० जुलै २०१४ नुसार कर्मचाऱ्यांना कामावर कायम करण्यात यावे. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या परवानगीशिवाय शापोआ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येऊ नये. प्रत्येक शाळेत गॅस सिलिंडरचा पुरवठा करून त्याचा सर्व प्रकारचा खर्च शासनाने करावा. मानधन तसेच इंधन व भाजीपाल्याची रक्कम दर महिन्याचे ५ तारखेला जिल्हा परिषदेद्वारे शापोआ कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक बँक खात्यात जमा करण्यात यावी. दरवर्षी करारनामा करण्याची पद्धत बंद करून त्याऐवजी कामावर लागलेल्या दिवसांपासून नियुक्ती पत्र देण्यात यावे व हजेरी पट ठेवण्यात यावा. केंद्र शासनाने लोकसभेत शापोआ कर्मचारी हे फक्त ३ ते ४ तासांचे कर्मचारी आहेत असे सांगितले. त्यांच्या कमाची वेळ ३ ते ४ तास ठरवून घ्यावी अशी मागणी केली.(प्रतिनिधी)