राजुरा : राजुरा विधानसभा क्षेत्रातील नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत असून शेतकरी व सुक्षितित बेरोजगार युवकाचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या क्षेत्राच्या विकासासाठी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी दीड हजार कोटी रुपये आदिलाबाद रेल्वे मार्गासाठी मंजूर करवून घेतले, ही या विधानसभेची मोठी उपलब्धी आहे, असे प्रतिपादन आमदार अॅड. संजय धोटे यांनी पत्रकार परिषदेत केले.आ.धोटे म्हणाले, शेतकऱ्यांच्या शेतजमिनी सिंचनाखाली याव्या यासाठी राज्य शासनाच ‘जलयुक्त शिवार’ या महत्त्वकांक्षी योजनेतून विधानसभा क्षेत्रात ४७ बंधाऱ्याचे काम हाती घेतले आहे. त्यापैकी ३० बंधाऱ्याची कामे प्रगतिपथावर आहे. तर १७ बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे. ग्रामीण व शहरी भागातील महिला बचत गटांना स्वत: निर्मित केलेल्या वस्तुंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी त्यांना त्यातून आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी विशेष मार्केटिंग मॉल निर्मितीच्या प्रस्तावला शासनाची मान्यता मिळवून आणली असून प्रशासकीय कारवाई प्रगतीपथावर सुरू आहे. जीवती, राजुरा, कोरपना व गोंडपिंपरी तालुक्यातील अंतर्गत, गाव जोड पांदन रस्त्याच्या बांधकामाकरिता जिल्हा वार्षिक नियोजन निधी अंतर्गत जवळपास सहा कोटी रुपयांचे कामे मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले.
क्षेत्राचा कायापालट करणार - संजय धोटे
By admin | Updated: February 28, 2016 01:10 IST