चंद्रपूर : हिवाळ्यात केस तुटणे, गळणे ही समस्या अनेकांना सतावते. थंडीमुळे त्वचेतील आर्द्रता कमी होते, टाळूतला ओलावा कमी होतो आणि केस कोरडे होतात. त्यामुळे केस तुटणे, पातळ होणे आणि गळण्याचा धोका वाढतो. यासाठी हिवाळ्यात केसांची विशेष काळजी घ्यावी, असा सल्ला त्वचारोग तज्ज्ञ डॉ. प्रकाश रामटेके यांनी दिला आहे.
हिवाळ्यात केस गळती का वाढते ?
हिवाळ्यात टाळू आणि केसांचे रोमकूप कोरडे होतात, त्यामुळे केस कमजोर होतात. टाळूची नैसर्गिक आर्द्रता कमी झाल्याने केसांचा मऊपणा आणि मजबुती कमी होते. परिणामी, केस तुटणे आणि गळणे अधिक प्रमाणात होते.
कोंडा होण्याच्या प्रमाणातही वाढ
थंड हवेमुळे टाळूमधील नैसर्गिक तेलांचा प्रवाह कमी होतो. कोरडेपणामुळे टाळूवरील मृत पेशी जमा होतात, ज्यामुळे कोंडा वाढतो. जर वेळेवर स्वच्छता केली नाही तर हे केस गळण्यास कारणीभूत ठरते.
गरम पाण्यामुळेही केसगळती
हिवाळ्यात गरम पाण्याने केस धुतल्यास टाळूची नैसर्गिक आर्द्रता नष्ट होते. परिणामी, केस कोरडे होतात आणि तुटण्याची शक्यता वाढते. तसेच अत्यंत गरम पाण्याने टाळूत जळजळ किंवा जंतूसंसर्गाचा धोका निर्माण होतो.
काय काळजी घ्यावी?
सकस आहार आणि हायड्रेशन : हिवाळ्यात केसांच्या मजबुतीसाठी प्रोटीन, व्हिटॅमिन बी, झिंक आणि आयर्नयुक्त आहार घेणे आवश्यक आहे. पुरेसे पाणी पिण्याने केस आणि टाळू दोन्ही हायड्रेट राहतात.
हेअर ड्रायरचा वापर योग्य आहे का?
ड्रायर वापरल्यास केस कोरडे होतात. शक्य असल्यास नैसर्गिकरित्या सुकू द्या. गरजेप्रमाणे ड्रायर वापरल्यास कमी उष्णतेवर हलके वायू प्रवाह वापरा.
कोंड्यावर उपचार काय?
कोंडा कमी करण्यासाठी सौम्य अॅन्टी-डैंड्रफ शॅम्पू वापरा. घरगुती उपाय जसे लिंबाचा रस किंवा टी ट्री ऑईल कोंडा कमी करण्यात मदत करतात. वेळोवेळी टाळू स्वच्छ ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
या आजारांमुळेही होते केसगळती
थायरॉईड, हार्मोनल बदल, पोषणतत्त्वांची कमतरता किंवा काही आजारांमुळे हिवाळ्यात केस गळतात. हिवाळ्यातील केसांचा योग्य प्रकारे सांभाळ हे या समस्यांचा सामना करण्यासाठी महत्त्वाचे आहे.
- शॅम्पू आणि केमिकल्स टाळा : सुलभ शॅम्पू वापरा आणि सल्फेट, सल्फाईट किंवा हार्श केमिकल्स असलेले प्रॉडक्ट टाळा. हे केस कोरडे होण्यापासून वाचवते.
- थंडीपासून संरक्षण : थंड हवेमुळे केस तुटतात, म्हणून बाहेर जाताना केस झाकून ठेवा. उबदार हॅट, स्कार्फ किंवा हलकी कॅप वापरणे फायदेशीर आहे.
- तेलाचा मसाज : हिवाळ्यात आठवड्यात २-३ वेळा नारळ, बदाम किंवा ऑलिव्ह तेलाने मसाज करा. हे रोमकुपांमध्ये रक्ताभिसरण सुधारते, केस मजबूत होतात आणि गळण्याचा धोका कमी होतो.
- कंडिशनर वापरा: हलका कंडिशनर फक्त केसांच्या टोकांवर लावा. हे केस मऊ आणि ओलसर ठेवते, टाळू कोरडा होण्यापासून वाचवते..
"हिवाळ्यात केस गळणे ही नैसर्गिक समस्या आहे. पण योग्य आहार, तेल मसाज, सौम्य शॅम्पू आणि नियमित हायड्रेशन यामुळे ती नियंत्रित करता येऊ शकते. केसांचा योग्य प्रकारे सांभाळ केल्यास तुटणे व गळणे टाळता येते. समस्या जास्तच जाणवत असल्यास त्वचारोग तज्ज्ञांना दाखवून उपचार घ्यावा."- डॉ. प्रकाश रामटेके, त्वचारोगतज्ज्ञ, चंद्रपूर
Web Summary : Winter dryness causes hair fall. Avoid hot water, use mild shampoo, oil massage, and stay hydrated. A balanced diet and protecting hair from cold are crucial. Consult a dermatologist if the problem persists.
Web Summary : सर्दियों में रूखेपन से बाल झड़ते हैं। गर्म पानी से बचें, हल्का शैम्पू इस्तेमाल करें, तेल से मालिश करें और हाइड्रेटेड रहें। संतुलित आहार और ठंड से बालों की सुरक्षा ज़रूरी है। समस्या बने रहने पर त्वचा विशेषज्ञ से सलाह लें।