शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
5
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
6
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
7
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
8
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
9
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
10
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
11
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
13
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
14
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
15
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
16
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
17
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
18
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
19
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!

आर्च, पायलट बंधाऱ्यांमुळे सिंचनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 06:00 IST

तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून सिंचनाची समस्या आ वासून उभी आहे, या परिसरात आसोलामेंढा, हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्प कार्यरत आहे. मात्र यातील पाणी काही विशिष्ट गावापर्यतच पोहचते. चौफर पाणी पोहचु शकत नाही. यामुळे नेहमीच शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक वाया जात असते. परंतु माजी पालकमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी अनेक नवनविन योजना कार्यान्वीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना मोठा दिलासा: तालुक्यात बंधारे बांधण्याला प्राधान्य

भोजराज गोवर्धन।लोकमत न्यूज नेटवर्कमूल : सिंचनाच्या अपुऱ्यां सोयीमुळे शेतकऱ्यांचे पीक वाया जावू नये, यासाठी तालुक्यातील मारोडा येथील आर्च व चिरोली येथील पायलट बंधारा नागरिकांसाठी आकर्षण ठरत आहे. या आर्च व पायलट बंधाऱ्यांमुळे परिसरातील सिंचनात वाढ झाली आहे.तालुक्यात मागील अनेक वर्षांपासून सिंचनाची समस्या आ वासून उभी आहे, या परिसरात आसोलामेंढा, हरणघाट उपसा जलसिंचन प्रकल्प कार्यरत आहे. मात्र यातील पाणी काही विशिष्ट गावापर्यतच पोहचते. चौफर पाणी पोहचु शकत नाही. यामुळे नेहमीच शेतकऱ्यांच्या हातात आलेले पिक वाया जात असते. परंतु माजी पालकमंत्री आ.सुधीर मुनगंटीवार यांनी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी अनेक नवनविन योजना कार्यान्वीत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तालुक्यातील मारोडा येथील आर्च बंधारा केवळ आठ लाख रूपयांत पूर्ण करण्यात येथील उपविभागीय अधिकारी प्रशांत वसुले आणि सहायक अभियंता रूपेश बोदले यांना यश आले आहे. या बंधाऱ्यात पाणीसाठाही मोठया प्रमाणावर आहे, पाणीसाठयात वाढ होण्याच्या दृष्टीने आर्च बंधारे नागपूर आणि अमरावती विभागात मोठया प्रमाणावर बांधण्याचे निर्देश बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागपूर येथे पार पडलेल्या बांधकाम विभागाच्या अभियंता बैठकीत दिले.तालुक्यातील आर्च बंधाऱ्यासोबतच जानाळा-पोंभुर्णा मार्गावरील पायलट बंधाराही नागरिकांचे आकर्षण बनले आहे. माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी खासदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत १८३.३१ लक्ष निधी उपलब्ध करून दिला. यामुळे सदर बंधाऱ्यांचे काम पुर्ण करण्यात आले आहे.तालुक्यातील चिरोलीजवळील अंधारी नदीवर सुमारे ९० मीटर लांबीचा पूल २०१५-१६ या वित्तीय वर्षात बांधण्यात आले होते. सदर पूलाच्या बाजुला बांधलेल्या बंधाऱ्याला २.८३ मीटर लांब व ३.५० मीटर उंचीचे २३ दरवाजे लावण्यात आले आहे. या ठिकाणी ३.९३ लक्ष घनमीटर पाणी साठा राहू शकतो. केवळ सहा महिन्यात बांधण्यात आलेल्या या बंधाऱ्यात सुमारे साडेपाच किमीपर्यंत पाण्याचा साठा आहे.सदर बंधाऱ्याला वेगवेगळया राज्यातील बांधकाम विभागाचे अधिकारी भेट देत आहेत. येत्या काही महिन्यात तालुक्यातील चिचाळा, बोरचांदली, नलेश्वर चिमढा येथील बंधाऱ्यांचे काम पुर्णत्वाा जाण्याची शक्यता आहे.मुनगंटीवारांकडून अधिकाऱ्यांची स्तुतीसिंचनाची समस्या कायस्वरूपी दुर व्हावी, यासाठी माजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काही प्रमाणात प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नाला सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भास्करवार, उपविभागीय अधिकारी प्रशांत वसुले, सहा. अभियंता रूपेश बोदले यांचे सहकार्य लाभत आहे. तालुक्यातील मारोडा येथील १५ मीटर लांबीच्या आर्च बंधाऱ्याला माजी पालकमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी भेट देऊन सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांची स्तुती केली. तालुक्यात यासारखे बंधारे मोठया प्रमाणावर बांधून शेतकऱ्यांना सिंचनाची सोय देण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांनी करावे,असे आवाहनही त्यांनी केले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरी