शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

निम्न पैनगंगा प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्प घोषित करा

By admin | Updated: October 4, 2015 01:48 IST

निम्न पैनगंगा प्रकल्प हा आंतरराज्यीय प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही राज्यातील शेतकरी हा सुजलाम-सुफलाम होऊन स्वयंपूर्ण होऊ शकतो.

शिवाजीराव मोघे : पाणी परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसादकान्हाळगाव (कोरपना) : निम्न पैनगंगा प्रकल्प हा आंतरराज्यीय प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे दोन्ही राज्यातील शेतकरी हा सुजलाम-सुफलाम होऊन स्वयंपूर्ण होऊ शकतो. शेतीला पाणी ही आवश्यक गरज आहे. त्यामुळे सिंचनाचाही मोठा अनुशेष या प्रकल्पाच्या माध्यमातून दूर होऊ शकतो. यासाठी या प्रकल्पाच्या कामाला गती येऊन हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात यावा, असे प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी केले. ते कोरपना येथे विदर्भ किसान मजदूर काँग्रेसच्या वतीने आयोजित शेतकरी मेळावा व पाणी परिषदेमध्ये बोलत होते.याप्रसंगी माजी खासदार नरेश पुगलिया, तेलंगणाचे माजी जलसंपदा मंत्री रामचंद्र रेड्डी, गडचिरोलीचे माजी खासदार मारोतराव कोवासे, माजी आमदार प्रभाकर मामुलकर, आर्णीचे नगराध्यक्ष आरिफ बेग, छाया मडावी, आदिलाबादचे नगराध्यक्ष दिगंबर पाटील, नरसिंहराव, त्र्यंबक पाटील, बाळासाहेब मोघे, गजानन गावंडे, प्रकल्प संयोजक अ‍ॅड.विजय घुले, डॉ.विजय देवतळे, अशोक नागापूरे, विजय पाटील, घनश्याम मुलचंदानी, अनकेश्वर मेश्राम, सुधा सिडाम, डॉ.अशोक राजूरकर आदी उपस्थित होते. मोघे पुढे म्हणाले, या प्रकल्पासाठी १९७० पासून दोन्ही राज्यातील नागरिकांचा संघर्ष सुरू आहे. हा प्रकल्प १९८५ मध्ये पूर्णत्वास येणे अपेक्षित असताना आजतागयत तो रेंगाळलेलाच आहे. दिवसेंदिवस या प्रकल्पाचाही खर्च वाढत चालला आहे. मात्र प्रकल्पाला चालना येऊ शकली नाही. यासाठी राजकीय अनास्था तेवढीच जबाबदार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास न आल्यास वेळप्रसंगी रस्त्यावरही उतरू, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. निम्न पैनगंगा हा आंतरराज्यीय प्रकल्प असून १९७५ च्या पाणी करारान्वये ८८ टक्के पाणी महाराष्ट्राला तर १२ टक्के पाणी या प्रकल्पामुळे तेलंगणाला उपलब्ध होणार आहे.या प्रकल्पामुळे नांदेड, आदिलाबाद, यवतमाळ, चंद्रपूर जिल्ह्यातील २ लाख १७१ हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे. याचा सर्वाधिक लाभ हा कोरपना व राजुरा तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार आहे. यावेळी माजी खासदार नरेश पुगलिया, माजी मंत्री रामचंद्र रेड्डी, माजी खासदार मारोतराव कोवासे, प्रकल्प संयोजक अ‍ॅड. विजय घुते, माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. परिषदेचे संचालन रमजान अली यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गोदरू जुमनाके, साईनाथ बुच्चे, अविनाश जाधव, घनश्याम नांदेकर, महेंद्र बोरा, प्रशांत लोडे, अविनाश गोवारकर, जमीरउल्ला बेग, शौकत अली, शाहीद अली, निसार शेख, फरहान शेख, आदींनी सहकार्य केले. (वार्ताहर)