शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वीज पडून जनावरे दगावली? ऑनलाइन नोंदणी असेल तरच तातडीची मदत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 16:36 IST

शासनाच्या नैसर्गिक आपत्तीतून मदत : मात्र योजनेच्या माहितीचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वीज पडून जनावरे दगावलेल्या पशुपालकांना सरकारच्या नैसर्गिक आपत्तीतून तातडीने मदत केली जाते; मात्र यासाठी जनावरांची ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. अनेक शेतकऱ्यांना या अटीची माहिती नसते. त्यामुळे दुर्घटनेनंतर मदतीपासून ते वंचित राहतात. संबंधित गावातील शासकीय पशु चिकित्सालयातील डॉक्टर, गावातील कृषी सेवक यांनी ऑनलाइन नोंदणीसंदर्भात शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याची गरज आहे.

पशुधन मालकांनी त्यांच्या जनावरांची ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीमुळे जनावरांची माहिती शासनाला उपलब्ध होते. विविध योजनांसाठी अनुदान, लसीकरण आणि आरोग्य सेवा पुरवणे ही कामेदेखील सोपी होतात. जनावरांचे इअर टॅगिंग ही त्यापैकीच एक मोहीम आहे. त्यातून आपत्तीकाळात पशुपालकाला मदत तत्काळ देणे शासनाला शक्य होते. त्यामुळे शेतकऱ्यांना याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

शेतकऱ्यांची समस्या काय?योजनेच्या माहितीचा अभाव ही शेतकऱ्यांची मूळ समस्या आहे. शेतकऱ्यांना ऑनलाइन नोंदणीसाठी ग्रामीण भागात अनेक वेळा शेतवस्त्यांवर इंटरनेटही उपलब्ध होत नाही. नेट कॅफेमध्ये नोंदणीसाठी पैसे द्यावे लागतात.

जनावरांच्या ऑनलाइन नोंदणीचा काय होतो फायदा?नोंदणीमुळे शेतकऱ्यांकडील जनावरांची प्रजाती, त्यांचे आजार, त्यावरील उपचार, संबंधित जिल्ह्यातील किंवा गावातील जनावरांची संख्या आदी तपशील शासनाकडे जमा होतो. आपत्ती प्रसंगी तातडीने मदत मिळण्यास मदत होते.

ऑनलाइन नोंदणी कशी?या उपक्रमांतर्गत तयार करण्यात आलेल्या 'इनाफ' (इन्फर्मेशन नेटवर्क फॉर प्रॉडक्टिव्हिटी अँड हेल्थ) या प्रणालीत जनावरांचे टॅगिंग करण्यात येऊन त्यांची सर्व माहिती नोंदवली जाते. 

ऑनलाइन नोंदणी हवीच!जनावरांची ऑनलाइन नोंदणी असल्याचा फायदा शेतकऱ्यांबरोबरच सरकारलाही होतो. जनावरांचे लसीकरण, स्थानिक पशुचिकित्सालयात जनावरांसाठी आरोग्य सुविधा, महापुरासारख्या आपत्ती प्रसंगी जनावरांचे व्यवस्थापन, अशी कामे करणे सरकारला शक्य होते.

लागणारी कागदपत्रे ?भारत पशुधन प्रणालीत जनावरांच्या नोंदणीसाठी पशुपालकांना पत्ता, मोबाइल नंबर, आधार यासह जनावरांची प्रजात, त्यांचे वय आदी तपशील अपलोड करावा लागतो. 

टॅग्स :chandrapur-acचंद्रपूरgovernment schemeसरकारी योजना