शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांनाही होतो 'ॲसिडिटी'सारखा त्रास; कारणं अन् उपाय काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 16:38 IST

पशुपालकांनी करावा वेळीच औषोधपचार : उकिरड्यावरील अन्न खाल्याने होतो आजार

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : पोटाचे विकार अथवा खाण्यामध्ये कमी-जास्त झाले असेल तर माणसाला अॅसिडिटी होते. तसाच काहीसा प्रकार जनावरांच्या अॅसिडिटीच्या बाबतीतही आहे. जनावरांमध्ये अॅसिडिटी ही एक सामान्य समस्या आहे, जी त्यांच्या पचनसंस्थेवर परिणाम करते, हे प्रामुख्याने त्यांच्या आहारातील बदलांमुळे होते. त्यामुळे वेळीच लक्ष देणे महत्त्वाचे असते. अन्यथा जनावराचा जीवही जाऊ शकतो. वेळीच पशुवैद्यकांकडून तपासणी करून औषधोपचार करून घेणे आवश्यक असते.

आतड्यांत अन्न पचत नाही तर कुजते !जनावरांमध्ये अॅसिडिटी होण्याची अनेक कारणे आहे. त्यातील महत्त्वाचे कारण म्हणजे उकिरड्यावर पडलेले काहीही खाणे. मोठ्या जनावरांच्या खाण्यात तर प्लास्टिक, कागददेखील येतो. तर लहान जनावरे उकिरड्यावरील कुजलेले शिळे अन्न खात असल्याने अॅसिडिटी होते. अॅसिडिटीमुळे आतड्यांत अन्न पचत नाही तर कुजते. त्यामुळे पचनक्रियेत अडथळा येतो, पोटात वायू तयार होतो. यामुळे पोटदुखी आणि अस्वस्थता जाणवू शकते. 

पचनसंस्थेत अत्याधिक आम्ल वाढल्याचा परिणामजनावरांना जास्त प्रमाणात धान्य, साखर किंवा इतर कार्बोहायड्रेट युक्त पदार्थ दिल्यास, त्यांच्या पोटात आंबायला लागते. ज्यामुळे अॅसिडिटी होते.

आम्लविषार व आम्लपित्त यांत फरक काय ?रक्त आणि इतर द्रवपदार्थांमध्ये आम्लाची पातळी वाढल्यास आल्मविषार होतो. तर जठरात तयार होणारे आम्ल अन्ननलिकेमधून घशाकडे सरकल्यास आम्लपित्त होते. यामुळे पशुपालकांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे असते.

कुत्र्यांमध्ये अॅसिडिटीचे प्रमाण जास्तलहान जनावरांचा तुलनेत मोठ्या जनावरांमध्ये अॅसिडिटीचे प्रमाण जास्त असते. पण काही विशिष्ट प्रजातीच्या कुत्र्यांमध्ये अॅसिडिटीचे प्रमाण जास्त दिसून येते.

आम्लविषार झाल्यास जनावराची लक्षणेजनावरांना उलट्या, अतिसार आणि पचनसंस्थेचे विकार होऊ शकतात. जनावरांना खाद्यपदार्थाचे योग्य प्रकारे पचन होत नाही. पोट फुगते, डोकेदुखी वाढते. खाणे-पिणे कमी होते. श्वास घेण्यास त्रास होणे, शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होणे, चक्कर येणे आदी लक्षणे दिसतात.

आम्लविषार होण्याची कारणे काय? जनावरांना आम्लविषार होण्याची अनेक कारणे असू शकतात. जसे की जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट असलेले खाद्यपदार्थ देणे, पचनसंस्थेतील बदल किंवा काही विशिष्ट आजार असणे. 

"कुजलेले, नासलेले अन्न खाल्यामुळे अनेकवेळा असे विकार होतात. जनावरांना मधुमेह असेल तर अॅसिडिटी होते. त्यामुळे पिण्याचे पाणी योग्य वेळेत देणे तसेच चारा चांगल्या दर्जाचा आणि प्रमाणात देणे महत्त्वाचे आहे. उकिरड्यावर टाकलेले जेवण जनावरे खाणार नाही, याची काळजी घ्यावी. वेळोवेळी लसीकरण करून घ्यावे."- डॉ. नंदकिशोर मैंदळकर, सेवानिवृत्त पशुवैद्यकीय अधिकारी, चंद्रपूर

टॅग्स :Farmerशेतकरीfarmingशेतीchandrapur-acचंद्रपूर